छोटी क्रेन ठरली अपयशी
By Admin | Updated: August 28, 2016 02:21 IST2016-08-28T02:21:58+5:302016-08-28T02:21:58+5:30
प्रत्यक्षदर्शीनुसार महाजाम लागल्यानंतर रस्त्याच्या मधे असलेल्या ट्रक ट्रेलरला बाजूला करणयासाठी दोन लहान क्रेन बोलावण्यात आल्या.

छोटी क्रेन ठरली अपयशी
अपघातानंतर वर्धा मार्गावर जाम
नागपूर : प्रत्यक्षदर्शीनुसार महाजाम लागल्यानंतर रस्त्याच्या मधे असलेल्या ट्रक ट्रेलरला बाजूला करणयासाठी दोन लहान क्रेन बोलावण्यात आल्या. परंतु खूप मेहनत केल्यानंतरही क्रेन ट्रक ट्रेलर जागेवरून हालवू शकली नव्हती. यात खूप वेळ निघून गेला. या वेळात केवळ ट्रकट्रेलर थोडासा बाजूला झाला, त्यामुळे जाममध्ये अडकलेली वाहने जाऊ शकली. वाहतूक सुरळीत झाल्यावर मात्र दोन्ही वाहनांना बाजूला करण्यात आले. (प्रतिनिधी)
पिण्याच्या पाण्याने हाल
कडक उन्हात महाजाममध्ये फसलेल्या वाहनांमध्ये बसलेल्या नागरिकांचे हायवेवर पिण्याच्या पाण्याने हाल केले. पिण्याच्या पाण्यासाठी लोक ओरडू लागले. पिण्याचे पाऊच विकणाऱ्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. एकेक पाऊच पाच-पाच रुपयाला विकले गेले.