एकीकडे घुुमारे, दुसरीकडे निराशा

By Admin | Updated: November 28, 2015 03:31 IST2015-11-28T03:31:45+5:302015-11-28T03:31:45+5:30

डान्सबार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Slowly on one hand, despair on the other hand | एकीकडे घुुमारे, दुसरीकडे निराशा

एकीकडे घुुमारे, दुसरीकडे निराशा

डान्सबार : वास्तव उपराजधानीचे
नरेश डोंगरे नागपूर
डान्सबार परवान्याबाबत दोन आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिल्यामुळे राज्यभरातील डान्सबार मालक आणि आंबटशौकिनांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. दुसरीकडे डान्सबार अधिकृतपणे सुरूच होऊ नये, अशी प्रार्थना नागपूर शहर आणि जिल्ह्यात ‘छुपे डान्सबार’ चालविणाऱ्यांकडून केली जात आहे. संबंधित सूत्रांचा कानोसा घेतला असता ही धक्कादायक माहिती पुढे आली. ‘चोरी, छुपे ठीक आहे. पण उघडपणे डान्सबार सुरू झाल्यास त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ शकतात’, असा भीतीवजा युक्तिवादही ‘त्यांच्या’कडून केला जात आहे.
दलालांच्या पुढाकाराने शहर आणि जिल्ह्यातील काही बारमालक पोलिसांशी हातमिळवणी करून चोरी छुप्या मार्गाने डान्सबार चालवितात. रोज नव्हे मात्र आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस या बारमध्ये डान्स होतो. अनेकदा विशिष्ट आंबटशौकिन ग्राहकांच्या मागणीवरूनच बारमध्ये डान्सचे आयोजन केले जाते. अनेकदा बारमालक बारमध्ये तर काही वेळा रिसोर्ट, फार्म हाऊस किंवा बंगल्यातही ‘तात्पुरता (काही तासांसाठी) बार सुरू करून डान्स’चे आयोजन करतो.

Web Title: Slowly on one hand, despair on the other hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.