तापमानात किंचित वाढ, गारठा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:21+5:302020-12-25T04:08:21+5:30
नागपूर : गेल्या २४ तासामध्ये विदर्भातील तापमानात किंचितशी वाढ नाेंदविण्यात आली आहे. तापमान वाढले तरी थंडीचा कडाका मात्र ...

तापमानात किंचित वाढ, गारठा कायम
नागपूर : गेल्या २४ तासामध्ये विदर्भातील तापमानात किंचितशी वाढ नाेंदविण्यात आली आहे. तापमान वाढले तरी थंडीचा कडाका मात्र आजही कायम आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी गाेठविणाऱ्या थंडीचा बाेचरेपणा अनुभवायला मिळताे. नेहमीप्रमाणे गाेंदिया व भंडाऱ्याचे तापमान आजही विदर्भात सर्वात कमी हाेते. विदर्भात रात्रीच्या वेळी थंडीचा प्रकाेप चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. गारठा वाढत असल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. सायंकाळनंतर बाहेर पडण्यास टाळले जाते. त्यामुळे रात्री संचारबंदी लागल्यासारखी स्थिती जाणवते. हवामान विभागातर्फे गुरुवारी नागपुरात ९.८ अंश तापमानाची नाेंद झाली. गाेंदिया, भंडारा जिल्ह्यात कालच्या तुलनेत ०.८ अंशाची वाढ झाली असून गुरुवारी ८.८ अंशाची नाेंद करण्यात आली. त्यानंतर यवतमाळात ९ अंशाची नाेंद झाली. वर्धा १०.२ अंश, चंद्रपूर ११.२ अंश, गडचिराेली ११.४, वाशिम ११.६, अकाेला १०.४, बुलडाणा १२.४ तर अमरावतीत ११.९ अंश किमान तापमानाची नाेंद हवामान खात्याने केली आहे. पुढच्या आठवड्यातही आकाश नीरभ्र राहणार असून वातावरणातील गारठा असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.