आकाश ढगाळलेले, पारा घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:03+5:302021-02-05T04:53:03+5:30
नागपूर : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, २८ जानेवारीच्या सकाळी आकाश ढगाळलेले होते. मात्र जिल्ह्यात कुठेही पाऊस आला नाही. ...

आकाश ढगाळलेले, पारा घटला
नागपूर : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, २८ जानेवारीच्या सकाळी आकाश ढगाळलेले होते. मात्र जिल्ह्यात कुठेही पाऊस आला नाही. असे असले तरी नागपुरातील वातावरणामध्ये मात्र सकाळी चांगलाच गारवा होता.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवारी सकाळी सर्वच ठिकाणी वातावरण ढगाळलेले होते. सकाळी १० वाजेपर्यंत सूर्यदर्शनही झाले नाही. मात्र त्यानंतर वातावरण निवळले. कुठेही पावसाची नोंद झाली नाही. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, नागपुरात किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गोंदियातील तापमानात कालच्यापेक्षा वाढ झाली असली तरी येथे पारा १४ अंशावर नोंदविण्यात आला. विदर्भात चंद्रपुरातील तापमान अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. तिथे कमाल तापमान ३२.४ अंश तर किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
नागपुरातील वातावरणात मागील आठवड्यापासून कमी-अधिक बदल जाणवत आहे. शहरात गुरुवारी सकाळी आर्द्रता ६९ टक्के होती. तर सायंकाळी ती ५८ टक्के नोंदविण्यात आली. शहरातील दृश्यमानता २ ते ४ किलोमीटर होती.