शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशाचीही ‘स्टॅम्प’मुळे त्वचा सोलून निघाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:46 IST

व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादवरून परतलेल्या नागपूर येथील एका प्रवाशाच्या हातावर रेल्वेस्थानकावर स्टॅम्प लावल्यानंतर शाई लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघाली.

ठळक मुद्देरेल्वेस्थानकावर मारला क्वारंटाईन स्टॅम्प : शाई ठरली घातक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : व्यवसायाच्या निमित्ताने हैदराबादवरून परतलेल्या नागपूर येथील एका प्रवाशाच्या हातावर रेल्वेस्थानकावर स्टॅम्प लावल्यानंतर शाई लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघाली. त्या प्रवाशाला आपण दुप्पट-तिप्पट प्रवासभाडे देऊनही हाताला जखम झाल्यामुळे पश्चाताप होत आहे.मोहननगर येथील रहिवासी रिचर्ड अँथोनी यांनी सांगितले की, ते २५ जूनला रेल्वेगाडी क्रमांक ०२६९२ नवी दिल्ली-सिकंदराबाद स्पेशल रेल्वेगाडीने हैदराबादला गेले होते. सिकंदराबादला येणाऱ्या किंवा जाणाऱ्या कोणत्याही प्रवाशाच्या हातावर स्टॅम्प लावण्यात आला नाही. येथे काही आवश्यक प्रश्न विचारून प्रवेश देण्यात आला. ते १ जुलैला रेल्वेगाडी क्रमांक ०२४३७ सिकंदराबाद-नवी दिल्ली या गाडीने नागपूरला पोहोचले. नागपूरवरून हैदराबादला जाण्यासाठी त्यांनी २०८९ रुपये प्रवासभाडे दिले आणि परतीच्या प्रवासात ११०९ रुपये दिले. नागपूर रेल्वेस्थानकावर त्यांच्या हातावर क्वारंटाईन करण्यासाठी स्टॅम्प लावण्यात आला. काही तासानंतर स्टॅम्प लावलेल्या ठिकाणाची त्वचा सोलून निघत होती. २ जुलैला दुपारी त्यांनी डॉक्टरांना आपला हात दाखविला. हाताची त्वचा सोलून निघणारी शाई का वापरण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांना त्वचेचा कोणताही आजार नाही. याबाबत त्यांनी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे रुग्णालयास संपर्क केला. परंतु त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांनी संबंधित प्रवाशाने फ्लॅक्सी भाडे देऊन प्रवास केल्याचे सांगून त्यांच्या हातावर स्टॅम्प लावण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याचे सांगितले. याबाबत रेल्वेनेमहापालिकेकडे तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेpassengerप्रवासी