मंदसौरमध्ये विषारी दारूचे सहा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:09 AM2021-07-28T04:09:27+5:302021-07-28T04:09:27+5:30

मंदसौर : मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात विषारी दारू प्रकरणात मंगळवारी आणखी तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात ...

Six victims of poisonous liquor in Mandsaur | मंदसौरमध्ये विषारी दारूचे सहा बळी

मंदसौरमध्ये विषारी दारूचे सहा बळी

Next

मंदसौर : मध्यप्रदेशच्या मंदसौर जिल्ह्यात विषारी दारू प्रकरणात मंगळवारी आणखी तीन लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात मृत्यूची संख्या सहावर गेली आहे. या प्रकरणातील चार जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि एका सहायक उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या पिपलिया मंडी ठाण्याचे प्रभारी ओ.पी. तंतवार म्हणाले, तीन पुरुषांचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये दोघांचे वय ४० वर्षे तर एक ३५ वर्षांचा होता. मृत्यू झालेल्या लोकांनी एका ढाब्यावरून दारू खरेदी केली होती. यापूर्वी मंदसौर जिल्ह्याच्या खाखराई गावात शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री एका किराणा दुकानातून खरेदी केलेल्या दारूचे सेवन केल्यानंतर तिघांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. एका रुग्णाने पत्रकाराला सांगितले, ढाब्यावरून दारू खरेदी केली होती आणि ती पिल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले. मंदसौर जिल्हा रुग्णालयात भरतीनंतर एक अन्य रुग्ण म्हणाला, एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी, ती पिल्यानंतर अंधुक दिसू लागले.

मंदसौर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. के. डी. शर्मा यांनी सांगितले, मंगळवारी दारू पिल्यानंतर लोकांना उपचारासाठी भरती करण्यात आले होते. एका व्यक्तीचा खासगी रुग्णालयात तर अन्य एकाचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पिपलिया मंडीतही एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या सर्व लोकांचे मृत्यू दारू पिल्याने झाले आहेत.

घटना दडपण्याचा सरकारचा प्रयत्न : कमलनाथ

राज्याचे अबकारी मंत्री जगदीश देवडा हे या विधानसभा क्षेत्राचे असल्याने या गंभीर घटनेत मरणाऱ्यांची संख्या सरकार लपवित असल्याचा आरोप मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रमुख कमलनाथ यांनी केला आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे अजूनही आदेश दिलेले नाहीत. नकली दारू प्रकरणात पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणाही सरकारने केलेली नाही. सरकार दारू व्यवसायात लिप्त माफियांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

मध्यप्रदेश भाजपचे सचिव रजनीश अग्रवाल म्हणाले, गेल्या काँग्रेसच्या काळातील मोठ्या अवैध दारू व्यावसायिकांविरुद्ध सरकारची कारवाई सुरू आहे.

Web Title: Six victims of poisonous liquor in Mandsaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.