लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लकडगंजच्या ट्रान्सपोर्ट नगरातून पोलिसांनी सहा ट्रकमध्ये १.९८ कोटीची सुपारी जप्त केली आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकांना ताब्यात घेतले असून सुपारीवर दावा करण्यासाठी एकही व्यापारी पुढे आला नसून ट्रक चालकांनीही सुपारीबाबत कोणतेच कागदपत्र सादर केले नाही.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना शनिवारी दुपारी १.३० वाजता सहा ट्रक सुपारी घेऊन पोहोचल्याची सूचना मिळाली. त्यानंतर ट्रान्सपोर्टनगरचे अल्ताफ ऊर्फ मामा यांच्या गोदामाजवळ पोलिसांच्या पथकाने ट्रक क्रमांक केए/३१-ए-१६०३ चा चालक व्यंकटेश अंजया नाईक (२३) सीर्सी, कारवा, सी. जी. ०४-एलटी-५६५३ चा चालक परगट सिंह सेवा सिंह (४८) रा. इंदोर, एमपी ०४, जीबी-१३५९ चा चालक मुकेश बुरडे (२८) रा. पार्वतीनगर कळमना, युपी ७१, टी-५३१० चा चालक गंगाराम मुन्नीलाल (३८) रा. बडागाव, फतेहपुर, जीजे २५, टी ७६९२ चा चालक लीलाभाई अर्जुनभाई कडेगिया (४२) रा. पोरबंदर, गुजरात आणि एमएच ४९, एटी-३५८२ चा चालक संतकुमार लक्ष्मण बगली (२५) रा. गुंडवन, विजयपूर यांना त्यांच्या ट्रकमध्ये असलेल्या सुपारीच्या बिलाची मागणी केली. परंतु त्यांनी बिल देण्यास असमर्थता दाखविली. त्यावर पोलिसांनी डीआयआर विभागाच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद सुपारी आणण्यात आल्याची माहिती देऊन घटनास्थळी येण्याची विनंती केली. परंतु डीआयआर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाही. त्यानंतर लकडगंज पोलीस सर्व ट्रक घेऊन ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी सुपारी आणि ट्रकसह २ कोटी ५८ लाख ६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार नरेंद्र हिवरे, सहायक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, अजय बैस, पवन भटकर, प्रदीप सोनटक्के यांनी पार पाडली.संशयास्पद माल असल्यामुळे केला जप्तलकडगंज ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी सांगितले की, सहा ट्रकमध्ये बिलाविना खराब सुपारी नागपूरच्या ट्रान्सपोर्ट नगरात पोहोचल्याची सूचना मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रकमध्ये सुपारी आढळली. ट्रकचालक बिल दाखवू शकले नाहीत. याची सूचना डीआयआरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आणि संशयास्पद माल असल्यामुळे सुपारी जप्त करण्यात आली.
नागपुरातील ट्रान्सपोर्टनगरातून १.९८ कोटीची सहा ट्रक सुपारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:34 IST
लकडगंजच्या ट्रान्सपोर्ट नगरातून पोलिसांनी सहा ट्रकमध्ये १.९८ कोटीची सुपारी जप्त केली आहे. पोलिसांनी ट्रकसह चालकांना ताब्यात घेतले असून सुपारीवर दावा करण्यासाठी एकही व्यापारी पुढे आला नसून ट्रक चालकांनीही सुपारीबाबत कोणतेच कागदपत्र सादर केले नाही.
नागपुरातील ट्रान्सपोर्टनगरातून १.९८ कोटीची सहा ट्रक सुपारी जप्त
ठळक मुद्देलकडगंज पोलिसांची कारवाई : बिल, कागदपत्र दाखविण्यास ट्रक चालक असमर्थ