जिल्हाधिकारी कार्यालयात सहा मजल्यांची ग्रीन बिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:09+5:302021-03-09T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय आता नवीन रूपात दिसेल. राज्य सरकारने आज आपल्या अर्थसंकल्पात जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक ...

जिल्हाधिकारी कार्यालयात सहा मजल्यांची ग्रीन बिल्डिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालय आता नवीन रूपात दिसेल. राज्य सरकारने आज आपल्या अर्थसंकल्पात जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २५० कोटी रुपयाची तरतूद केली आहे. या निधीतून येथे ग्राऊंड फ्लोअरसह सहा माळ्यांची भव्य इमारत उभारण्यात येईल.
६ हजार वर्गमीटर क्षेत्रात ही इमारत उभारण्यात येईल. या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सर्व विभाग असतील. जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयातील जागेवर ही इमारत होईल. सध्या या जागेचा उपयोग पार्किंगसाठी केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले होते. या प्रेझेंटेशननुसार ग्रीन इमारतीच्या सर्व मानकांचे पालन करीत ही इमारत तयार करण्यात येईल. दोन वर्षात काम पूर्ण करणयाचा दावा करीत, ही इमारत उभारण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. याचा प्राथमिक नकाशाही तयार झालेला आहे. सूत्रानुसार गरजेनुसार यात बदल होऊ शकतो.
बॉक्स
नवीन लुक-नवीन जोश - जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाशी जुळलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली येतील. अत्याधुिनक इमारतीमुळे परिसराला नवीन लुक मिळेल तर कर्मचऱ्यांमध्येही जोश वाढेल.