शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

दसऱ्यानिमित्त सहा विशेष रेल्वेगाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:38 AM

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनागपूर, पुणे, नाशिक, मुंबई मार्गावर अनुयायींसाठी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार नागपूर-पुणे, नासिक रोड-नागपूर, मुंबई-अजनी, अजनी-मुंबई, मुंबई-नागपूर आणि नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनससाठी ६ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत.रेल्वे प्रशासनाने घेतलेल्य्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०३० नागपूर-पुणे अनारक्षित रेल्वेगाडी नागपूरवरून १८ आॅक्टोबरला रात्री ११ वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड येथे थांबेल.रेल्वेगाडी क्रमांक ०१०१२ मुंबई-अजनी विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १८ आॅक्टोबरला रात्री १२.२० वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी दुपारी २.१५ वाजता अजनीला येईल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदुर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम येथे थांबेल.रेल्वेगाडी क्रमांक ०१०१२ अजनी मुंबई विशेष रेल्वेगाडी १९ आॅक्टोबरला रात्री ११.०५ वाजता सुटुन दुसऱ्या दिवशी दुपारी २.४० वाजता मुंबईला पोहोचेल. ही गाडी सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नासिक रोड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर येथे थांबेल.रेल्वेगाडी क्रमांक ०१०७५ मुंबई-नागपूर विशेष रेल्वेगाडी मुंबईवरून १७ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५.१० वाजता नागपुरात पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नासिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम,अजनी येथे थांबेल.रेल्वेगाडी क्रमांक ०१०१७ नासिक रोड-नागपूर विशेष रेल्वेगाडी नासिक रोड येथून १८ आॅक्टोबरला सकाळी ४.४५ वाजता सुटून दुपारी ३.१५ वाजता नागपूरला येईल. ही गाडी मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनीला थांबेल.रेल्वेगाडी क्रमांक ०१०१८ नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी १९ आॅक्टोबरला दुपारी २.१५ वाजता नागपूरवरून सुटून रात्री ३.१० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी अजनी, सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नासिक रोड, ईगतपुरी, कल्याण, ठाणे येथे थांबेल.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी