शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड स्थानकावर आणखी सहा रेल्वेगाड्या थांबणार; मध्य रेल्वेचा निर्णय

By नरेश डोंगरे | Updated: August 19, 2023 13:59 IST

२० ऑगस्टपासून अंमलबजावणी

नागपूर : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब अंतराच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० ऑगस्टपासून डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीच्या रुपात होणार आहे.

अमृत भारत योजनेत समावेश झाल्यामुळे लवकरच नवे रंग रुप आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण होण्याच्या तयारीत असलेल्या नरखेड रेल्वे स्थानकाचे महत्व दिवसांगणिक वाढत आहे. येथून बसणाऱ्या - उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत आता मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावर आणखी सहा लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे रेल्वे स्थानक म्हणून नरखेडची ओळख आहे.

गेल्या काही वर्षांत या स्थानकावर प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. ते लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नरखेड स्थानकावरून धावणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना येथे यापूर्वी थांबे दिलेले आहेत. आता आणखी दूर अंतराच्या सहा नवीन रेल्वे गाड्यांना थांबे दिले आहेत. मध्य रेल्वेच्या या निर्णयाचे नागपूर जिल्ह्यातील आणि विशेषत: नरखेड परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत आहे.

या आहेत त्या सहा रेल्वे गाड्या

१९३०१ डॉ. आंबेडकर नगर - यशवंतपूर एक्सप्रेस २० ऑगस्टपासून१९३०२ यशवंतपूर - डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेस २२ ऑगस्टपासूनगाडी नंबर ११०४६ धनबाद - कोल्हापूर एक्सप्रेस : २१ ऑगस्टपासूनकोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस : २५ ऑगस्टपासून१९७१४ काचीगुडा - जयपूर एक्सप्रेस - २१ ऑगस्ट पासून१९७१३ जयपूर - काचीगुडा एक्सप्रेस २६ ऑगस्ट पासून

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे