ग्रामीण रुग्णालयात आणखी सहा ऑक्सिजन मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:07 IST2021-04-17T04:07:59+5:302021-04-17T04:07:59+5:30
काटोल: काटोल तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता काटोल ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेड कमी पडत आहे. अशात तालुक्यातील कोरोनाबाधितांना जास्तीत जास्त ...

ग्रामीण रुग्णालयात आणखी सहा ऑक्सिजन मशीन
काटोल: काटोल तालुक्यात वाढती रुग्णसंख्या पाहता काटोल ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन बेड कमी पडत आहे. अशात तालुक्यातील कोरोनाबाधितांना जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड कसे उपलब्ध करून देता येईल याबाबत काटोल प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. याबाबत काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सोलर कंपनीकडे काटोल ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन मशीन उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याची विनंती केली होती. त्यानुसार सोलर कंपनीच्यावतीने आणखी सहा ऑक्सिजन मशीन काटोल ग्रामीण रुग्णालयाला शुक्रवारी भेट देण्यात आल्या. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक मुंधडा, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार नीलेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, डॉ. सुधीर वाघमारे आदी उपस्थित होते. यापूर्वी माजी आमदार आशिष देशमुख यांनी काटोल ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार येथे ऑक्सिजनयुक्त २० अतिरिक्त बेड वाढविण्यात आले होते.