मालेवाडा येथे सहा जुगाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST2021-05-14T04:09:28+5:302021-05-14T04:09:28+5:30
भिवापूर : पाेलीस पथकाने तालुक्यातील मालेवाडा येथे धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख ८०० रुपये जप्त केले. ...

मालेवाडा येथे सहा जुगाऱ्यांना अटक
भिवापूर : पाेलीस पथकाने तालुक्यातील मालेवाडा येथे धाड टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून राेख ८०० रुपये जप्त केले. ही कारवाई गुरुवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास करण्यात आली.
लाॅकडाऊनमुळे व्यवसाय व कामे ठप्प असल्याने काही गावात जुगार खेळला जात आहे. भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे तासपत्त्यांवर पैशांचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त सूचना भिवापूर पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी पाेलीस पथक मालेवाडा येथे पाठविले. पाेलिसांनी घटनास्थळी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत ८०० रुपये व जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे, दीपक जाधव, डोईफोडे, अच्युत गुट्टे, निकेश आरीकर, विनाेद झाडे यांच्या पथकाने केली.