२४ तासांत सहा मृत्यू

By Admin | Updated: March 5, 2015 01:44 IST2015-03-05T01:44:51+5:302015-03-05T01:44:51+5:30

देवराव साहू यांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते

Six deaths in 24 hours | २४ तासांत सहा मृत्यू

२४ तासांत सहा मृत्यू

मृत्यूची संख्या ६६ : स्वाईन फ्लू मृत्युसत्र कधी थांबणार?
देवराव साहू यांना मंगळवारी पहाटेच्या सुमारास मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला तर नमुन्याचा अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. त्यात त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले. अनिता शृंगारे यांना २५ फेब्रुवारी रोजी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले होते. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रामचरण पांडे हे १८ तारखेपासून एका खासगी इस्पितळात उपचार घेत होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना मंगळवारी सकाळी आॅरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, परंतु त्याच दिवशी रात्री ११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दोन आणि बुधवारी एक अशा तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान मेडिकलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३० झाली आहे, तर १४७ पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी सायंकाळी मेयोमधून आठ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यात चार पॉझिटीव्ह आढळून आले. यात एक ४०वर्षीय एक महिला असून तीन पुरुष आहेत. त्यामध्ये एक ८ महिन्यांचे आणि ४ वर्षांचे बाळ असून ६० वर्षांचा ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे. स्वाईन फ्लू वॉर्डात २२ रुग्ण दाखल असून यातील ८ रुग्ण पॉझिटीव्ह तर २४ संशयित आहेत. यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. स्वाईन फ्लूच्या बालरोग वॉर्डात ७ मुले असून यातील ४ पॉझिटीव्ह आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत ३३५ रुग्ण पॉझिटीव्ह आहेत.(प्रतिनिधी)
वैद्यकीय शिक्षणमंत्री
आज घेणार आढावा
वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे उद्या गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मेडिकलला भेट देणार आहेत. यावेळी ते स्वाईन फ्लूचा आढावा घेतील. यामुळे बुधवारी दोन्ही स्वाईन फ्लूचे वॉर्ड सज्ज करण्यात आले आहेत. सोबतच आकडेवारी गोळा करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Web Title: Six deaths in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.