तडीपारसह सहा गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:08 IST2020-12-29T04:08:07+5:302020-12-29T04:08:07+5:30

नागपूर : पाचपावली पोलिसांनी एका तडीपारसह सहा गुन्हेगारांना दरोड्याच्या तयारीत असताना पकडले. विशाल विजय मेश्राम (३२), रोहित ऊर्फ डीजे ...

Six criminals arrested, including Tadipar | तडीपारसह सहा गुन्हेगारांना अटक

तडीपारसह सहा गुन्हेगारांना अटक

नागपूर : पाचपावली पोलिसांनी एका तडीपारसह सहा गुन्हेगारांना दरोड्याच्या तयारीत असताना पकडले. विशाल विजय मेश्राम (३२), रोहित ऊर्फ डीजे शंकर पराते (२४) रा. बाळाभाऊपेठ, अभिषेक ऊर्फ भांज्या संजय गुलाबे (२९) तांडापेठ, राजू हरबनसिंह संधू (५२) कमाल चौक, संतोष ऊर्फ पापा गौरी नक्के (३०) रा. कपिलनगर आणि अभिषेक ऊर्फ दत्या राजेंद्र सिंह (२१) रमाईनगर अशी आरोपीची नावे आहेत.

अभिषेक ऊर्फ भांज्या तडीपार गुन्हेगार आहे. त्याला आठ महिन्यापूर्वी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. यानंतरही तो परिसरात फिरत होता. पोलिसांना मेहंदीबाग पुलाजवळ आरोपी संशयास्पद अवस्थेत दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ शस्त्र सापडले. आरोपीजवळून शस्त्र व कार जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Six criminals arrested, including Tadipar