नियमात बसली, उत्साहात फुटली

By Admin | Updated: August 26, 2016 02:45 IST2016-08-26T02:45:26+5:302016-08-26T02:45:26+5:30

दहीहंडीचे मनोरे २० फुटापेक्षा उंच असणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे शेवटपर्यंत कायम राहिल्याने आयोजकांना धक्काच बसला होता.

Sitting in the rules, bursting with excitement | नियमात बसली, उत्साहात फुटली

नियमात बसली, उत्साहात फुटली

इतवारीची दहीहंडी : गोविंदाचा जल्लोष
नागपूर : दहीहंडीचे मनोरे २० फुटापेक्षा उंच असणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे शेवटपर्यंत कायम राहिल्याने आयोजकांना धक्काच बसला होता. त्यामुळे दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्यांचा आनंदही मावळला होता. कदाचित दहीहंडीचे आयोजनच होणार नाही, हंडीचे आयोजन झाले तरी थरार, उत्साह, आनंद मिळणार नाही, अशी भीती होती. परंतु आयोजकांनी लढविलेल्या शक्कलमुळे दहीहंडी नियमात बसली आणि उत्साहात फुटली. इतवारी नवयुवक मंडळातर्फे आयोजित दहीहंडीच्या उत्सवात दरवर्षीप्रमाणेच उत्साह आनंद सहभागी गोविंदांसह, दर्शकांनीही अनुभवला.
जन्माष्टमी म्हटले की, लोकांमध्ये दहीहंडी स्पर्धेचा वेगळाच उत्साह संचारतो. उंचावर असलेली दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोविंदा पथकांचे साहस आणि गोविंदा आला रे...ची आरोळी देत तेवढ्याच उत्साहात सहभागी होणारे दर्शक. साहसाचे असेच उत्साही दृश्य शहरातील इतवारी दहीहंडी स्पर्धेच्या वेळी दिसले. एक, दोन, तीन, चार...म्हणत गोविंदा पथकांनी जीवाची बाजी लावत दही-दुधाची मटकी फोडून लाखोंच्या बक्षिसाला गवसणी घातली. उंचापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न फसला की, नाचत परतणारे गोविंदा पथक पुढच्या प्रयत्नासाठी सज्ज राहत होते. प्रत्येक राऊंडनगर हंडीची उंची कमी होत होती. सर्वत्र हा उत्साह ओसंडून वाहत होता. दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले गोविंदा पथकातील सदस्य थरावर थर करुन दहीहंडीच्या उंचीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर हंडीपर्यंत गोविंदा पोहचण्यात यशस्वी जाले. हंडी फोडून गोविंदा पथकांनी आनंद साजरा केला.

फक्त ११ गोविंदांची अट
न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोजकांनी दहीहंडीची उंची २० फुट ठेवली होती. मात्र हंडी फोडण्यासाठी प्रत्येक चमूत ११ गोविंदाच सहभागी असतील अशी अट घातली होती. त्यामुळे गोविंदाचे मनोरे कमी झाले. मात्र थरार आणि उत्साह कायमच होता.

असे आहेत विजेते
महिलांमध्ये न्यू सोनेगावच्या राधाकृष्ण महिला मंडळाच्या चमूने दहीहंडी फोडली. तर पुरुष गटात सोनधरी येथील जय माँ काली क्रीडा मंडळाचे गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यात यशस्वी ठरले.

Web Title: Sitting in the rules, bursting with excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.