शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

मुख्यमंत्री महोदय, पंतप्रधानांकडे चला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 1:14 AM

बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देअभिजात दर्जा : अ. भा. मराठी साहित्य महामंडळाने पाठविले स्मरणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बडोदा येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या नेतृत्वात महामंडळ व लेखकांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेण्याची मागणी मान्य केली होती. त्यानुसार असे शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे त्वरेने नेण्यात यावे, अशी विनंती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. यासोबतच शासनाकडे गेली ८४ वर्षे प्रलंबित असलेल्या मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मागणीबाबत शासनाने प्रथमच सक्रियता दर्शवली आहे. आधीच ८४ वर्षे विलंब झालेल्या या मागणीच्या सकारात्मक पूर्तीसाठी शासनाने अधिक वेळ न घालवता त्वरित अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली एक उच्चाधिकार समिती त्या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी नेमावी अशीही विनंती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रात केली आहे.महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर शासनाकडे प्रलंबित अनेक ठराव, मागण्या , सूचना इ.संबंधाने प्रत्यक्षात काही कृती शासनाने करावी व त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणीही महामंडळाने केली होती. तिलाही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत महिनाभरात अशी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचेही स्मरण करून देत अशी बैठक उशिरात उशिरा ३० मार्चपूर्वी आयोजित करण्याची विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.... तर बेळगाववासीयांसोबत देणार धरणेसंमेलन समारोपप्रसंगी बेळगाववासीयांच्या संवेदनशील भावना प्रकट झाल्या होत्या. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री यावर तोडगा काढतील, यावर आमचा विश्वास आहे. बैठक होईस्तो धीर धरू व महिनाभरात अशी बैठक न झाल्यास बेळगाववासी धरणे धरणार असल्यास आपणही त्यांच्यासोबत असू याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य