शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन

By गणेश हुड | Updated: August 24, 2024 13:57 IST

राज्यात नराधमाना पाठिशी घालणारे सरकार : विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये  दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीकडून राज्यभरात मूक आंदोलन करण्यात येत आहे.  नागपुरात संविधान चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व नेत्यांनी तोंडावर काळीपट्टी बांधून निषेध आंदोलन केले. राज्यात नराधमांना पाठिशी घालणारे सरकार असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.  व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत ५७ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील महिला सुरक्षीत नाहीत. बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्यावर व न्यायालयाने फटकारल्यावर सरकारला जाग आली. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस यंत्रणेसोबतच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, तानाजी वनवे, रेखा बाराहाते, अशोक धवड, प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर