शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

सायलेंट मार्च फॉर विदर्भ : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हुंकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:50 PM

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात तरुणांंची संख्या लक्षवेधी होती.

ठळक मुद्देविविध संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात तरुणांंची संख्या लक्षवेधी होती. 

या सायलेंट मार्चचे ना कुणी नेतृत्व होते. ना कुणी प्रायोजक. सर्वसामान्य नागपूरकर हा याचा केंद्रबिंदू होता. हे या मार्चचे वैशिष्ट्य होते. संविधान चौक येथून दुपारी ३ वाजता हा मार्च निघाला. तत्पूर्वी संविधान चौक येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक सेल्फी पॉईंट  होता. यात सायलेंस मार्च फॉर विदर्भ लिहिलेले असून त्यासमोर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. तसेच स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. यासोबतच विदर्भ राज्याबाबत आपल्याला काय वाटते, ते एका पेपरवर लिहून द्यावयाची आगळीवेगळी मोहीमह राबवण्यात आली. यातही नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर हा मार्च निघाला. यशवंत स्टेडियम येथे पोहोचल्यावर डॉ. शशांक भोयर आणि मृणाली चिकटे या विद्यार्थ्यांनी आणि वर्धा येथील नंदाताई अलोणे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलेने स्वतंत्र विदर्भाबाबत आपले मनोगत व्यक्त करीत स्वतंत्र विदर्भ झाल्यावरच येथील प्रश्न सुटतील, असा विश्वास व्यक्त केला. 
या सायलेंट मार्चमध्ये माजी कुलगुरु प्रा. हरिभाऊ केदार, डॉ. कमल सिंग, प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, प्रबीरकुमार चक्रवर्ती, राजकुमार तिरपुडे, अ‍ॅड. मुकेश समर्थ, डॉ. गोविंद वर्मा, तेजिंदरसिंग रेणू, जयदीप कवाडे, नवनीतसिंग तुली, धनंजय धार्मिक, अ‍ॅड. रवी संन्याल, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, संदेश सिंगलकर, अ‍ॅड. स्मिता सिंगलकर, अविनाश काकडे, त्रिशरण सहारे, ज्ञानेश्वर रक्षक, नितीन रोंगे, माजी आमदार रमेश गजबे, राम आखरे, दीपक निलावार, दिलीप नरवडीया, विलास गजघाटे, उत्तम सुळके, मधुकर कुडू, उत्तमबाबा सेनापती, प्रभाकर फुलबांधे, माधवराव चन्ने, विलास भालेकर, राजेश बोरकर, विलास भालेकर, आदीसह विदर्भ राज्य आंदोलन समिती, किसान संघ, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशन, जनमंच, व्ही-कॅन, विदर्भ राज्य आघाडी (विरा), विदर्भ माझा, मराठा सेवा संघ, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, किसान सेवा संघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तृतीय पंथी समाज संघटन, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, विदर्भ ऑटो संघ यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.तृतीयपंथी व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर 
या सायलेंटर मार्चची खास बाब म्हणजे या मार्चमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होतेच. परंतु तृतीयपंथी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थी आणि तरुणांची संख्याही लक्षणीय होती.

 

टॅग्स :Vidarbhaविदर्भagitationआंदोलन