शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या गच्छंतीवर त्यांच्या समर्थकांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 11:53 IST

माजी मंत्री सतीश चतुर्वेदीचे समर्थक माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही.

ठळक मुद्देचतुर्वेदींच्या समर्थनार्थ पुढे आले नाहीत प्रतिक्रिया देणेही टाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेस पक्षातून काढण्यात आल्यामुळे त्यांचे समर्थक असलेले माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील, असे अपेक्षित होते. मात्र, कुणीही उघडपणे समोर येऊन चतुर्वेदी यांची बाजु घेतली नाही. माजी मंत्री अनिस अहमद यांनी मात्र डबल ए-बी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी केली.कारवाईनंतर चतुर्वेदी समर्थकांमधील अस्वस्थता वाढली होती. समर्थक नेते एकमेकांशी संपर्क साधून पुढील रणनीती आखण्यात व्यस्त होते. कुणीही या विषयावर उघडपणे बोलण्यास तयार नव्हते. लोकमतने संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता काहींनी प्रतिसाद दिला नाही तर काहींनी या विषयाची माहितीच नसल्याचे सांगत बोलणे टाळले. राऊत, धवड यांनी मोबाईलवर प्रतिसाद दिला नाही. गेव्ह आवारी यांनी आपण बाहेर असल्याचे सांगत यावर बोलणे टाळले. प्रफुल्ल गुडधे म्हणाले आपण कारवाईबाबत कुठलेही पत्र वाचलेले नाही. परत फोन करतो, असे सांगून त्यांनी फोन ठेवला. तानाजी वनवे यांनीही या विषयाला बगल दिली.

डबल एबी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी : अनिस अहमद- माजी मंत्री अनिस अहमद म्हणाले, चतुर्वेदी यांना निष्कासित करण्यात आल्याचे पत्र आपण व्हॉट्सअ‍ॅपवर पाहिले. मात्र, याची कुठलीही अधिकृत माहिती नाही. त्यांना पक्षातून काढण्यात आले असेल तर महापालिकेच्या निवडणुकीत डबल ए-बी फॉर्म वाटणाऱ्यांवरही कारवाई व्हावी. आपण पक्षश्रेष्ठींना भेटून चर्चा करून तशी मागणी करू. याबाबत आपण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशीही चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आलेल्या घटनेवर त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

टॅग्स :Satish Chaturvediसतीश चतुर्वेदी