प्रवेशपत्राचा तिढा कायम

By Admin | Updated: November 15, 2015 02:10 IST2015-11-15T02:10:37+5:302015-11-15T02:10:37+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी परीक्षा विभागाचे संगणकीकरण डोकेदुखी ठरत आहे.

The signature of the registrar continued | प्रवेशपत्राचा तिढा कायम

प्रवेशपत्राचा तिढा कायम

महाविद्यालयांचे असहकार्य : २६ पासून हिवाळी परीक्षांचे चौथे सत्र सुरू
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ प्रशासनासाठी परीक्षा विभागाचे संगणकीकरण डोकेदुखी ठरत आहे. यात आॅनलाईन रजिस्ट्रेशनपासून तर आॅनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यापर्यंत अनेक कसरती कराव्या लागत आहेत. शिवाय आता आॅनलाईन प्रवेशपत्राची नवीन समस्या निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वीही अशीच समस्या निर्माण झाली होती. गत ३० आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या सत्रात आलेल्या समस्येनंतर विद्यापीठ प्रशासनाने भविष्यात अशी अडचण निर्माण होणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यात कोणतही सुधारणा झाली नसून, आजही ‘जैसे थे’ स्थिती आहे. नुकत्याच ७ नोव्हेंबरपासून इंजिनिअरिंगची परीक्षा सुरू झाली असून, या परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या चौथ्या सत्रातील परीक्षांदरम्यान तीच समस्या निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे. माहिती सूत्रानुसार, अजूनपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशपत्र तयार झालेले नाही. त्यामुळे परीक्षा विभागाने हस्तलिखित प्रवेशपत्र तयार करणे सुरू केले आहे. विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या मते, आॅनलाईन प्रक्रियेसाठी महाविद्यालयांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने ही समस्या निर्माण होत आहे. अनेक महाविद्यालयांनी अजूनपर्यंत विद्यार्थ्यांचा आॅनलाईन डाटा उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे आॅनलाईन प्रवेशपत्र तयार करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The signature of the registrar continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.