२४,८९० वाहनचालकांनी तोडले सिग्नल
By Admin | Updated: February 16, 2015 02:13 IST2015-02-16T02:13:31+5:302015-02-16T02:13:31+5:30
वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे.

२४,८९० वाहनचालकांनी तोडले सिग्नल
वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यानेच याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षात पूर्व वाहतूक शाखेंतर्गत ५६४२ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. यांच्याकडून ५,२४,४०० रुपये वसूल करण्यात आले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत ८२०४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले तर यांच्याकडून ८,९५,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गत ५०३७ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून ७,९१,५०० रुपये वसूल करण्यात आले. एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गंत २३९४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,४१,८०० रुपये दंड वसूल करण्यात आला. इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत २३८९ वाहनचालकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून २,२१,२०० रुपये वसूल करण्यात आले. तर उत्तर वाहतूक शाखेंतर्गंत सर्वात कमी म्हणजे १२२४ वाहनधारकांनी सिग्नल तोडले. त्यांच्याकडून १,२०,३०० रुपये वसूल करण्यात आले.
वाहतूक सिग्नल तोडण्यात खासगी व एसटी बसही मागे नाहीत. गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत येणाऱ्या वाहतूक सिग्नलवरील या बसचालकांकडून सिग्नल तोडण्यात आले.
याची संख्या २५४ आहे. त्यानंतर पूर्व वाहतूक शाखेंतर्गंत २१४ बसचालकांनी सिग्नल तोडले. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गंत १६४, इंदोरा वाहतूक शाखेंतर्गंत ४८ तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत फक्त ४ बसचालकांनी सिग्नल तोडले. एकूण ७२,१०० रुपये दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे, उत्तर वाहतूक शाखेंतर्गत बसचालकांकडून एकही सिग्नल तोडले नसल्याची नोंद आहे. (प्रतिनिधी)