सिग्नल दुरुस्ती खर्च ३१ टक्क्यांनी वाढला

By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:19+5:302016-04-03T03:52:19+5:30

महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. परंतु दुसरीकडे शहरातील वाहतूक सिग्नलच्या संख्येत कोणत्याही स्वरूपाची वाढ झालेली नसताना...

Signal repair costs increased by 31 percent | सिग्नल दुरुस्ती खर्च ३१ टक्क्यांनी वाढला

सिग्नल दुरुस्ती खर्च ३१ टक्क्यांनी वाढला

स्थायी समितीची मंजुरी : नवीन सिग्नल नसतानाही खर्चात वाढ
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. परंतु दुसरीकडे शहरातील वाहतूक सिग्नलच्या संख्येत कोणत्याही स्वरूपाची वाढ झालेली नसताना देखभाल दुरुस्तीचा खर्च मात्र ३१.८७ टक्क्यांनी वाढला आहे. या वाढीव खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली.
शहराच्या चौकातील सिग्नलची संख्या १४८ आहेत. गेल्या वर्षभरात काही ठिकाणी स्वयंचलित एलईडी लाईट असलेले सिग्नल लावण्यात आले आहे. याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. त्यामुळे सिग्नल दुरुस्तीची जबाबदारी वाढलेली नाही. महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे सिग्नल दुरुस्तीवर ६६.३१ कोटीचा खर्च केला जातो. गेल्या वर्षभरात बाजारात दुरुस्तीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. असे असतानाही विभागाने दुरुस्तीच्या ८७.४४ लाखांच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविला. याला बैठकीत मंजुरी देण्यात आली. वास्तविक डिकोफर्न कन्स्ट्रक्शन कंपनीचा कंत्राट ११ मार्च २०१६ रोजी संपला आहे. वाढीव खर्चासह नुतनीकरणासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. महिन्याला शहरातील ४५ ते ५० वाहतूक सिग्नल बंद पडतात. यातील २५ ते ३० दुरुस्त केले जातात. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्रास होतो, असे असूनही दुरुस्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. वास्तविक या कंपनीला २०११ मध्ये सिग्नल दुरुस्तीचे काम १७ लाखांत देण्यात आले होते. परंतु कंपनीचे काम समाधानकारक नसल्याच्या तक्र ारी होत्या. असे असतानाही कंत्राट याच कंपनीच्या ३१.८७ टक्के वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)

हुडकेश्वर भागासाठी मोठा निधी
शहरात समाविष्ट करण्यात आलेल्या हुडकेश्वर-नरसाळा भागातील विकास कामावर महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या भागातील विकास कामांसाठी १२ कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. शनिवारी खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी महापालिकेचा वाटा म्हणून २ कोटी १३ लाखांची निविदा बैठकीत मंजूर करण्यात आली.

Web Title: Signal repair costs increased by 31 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.