पाेलिसांकडून राजभवनाची घेराबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:46+5:302021-01-16T04:12:46+5:30
उल्लेखनीय म्हणजे शनिवारी काँग्रेसतर्फे राजभवनाला घेराव करण्यात येत आहे. या आंदाेलनासाठी पक्षाचे दिग्गज नेते नागपूरला पाेहोचले आहेत. विदर्भातील सर्व ...

पाेलिसांकडून राजभवनाची घेराबंदी
उल्लेखनीय म्हणजे शनिवारी काँग्रेसतर्फे राजभवनाला घेराव करण्यात येत आहे. या आंदाेलनासाठी पक्षाचे दिग्गज नेते नागपूरला पाेहोचले आहेत. विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील शेतकरी व पक्षाचे कार्यकर्ते शहरात पाेहोचून राजभवनाला घेराव करणार आहेत. आधी हे आंदाेलन मुंबईला हाेणार हाेते. मात्र, राज्यपाल भगतसिंह काेश्यारी नागपूर दाैऱ्यावर असल्याने येथे आंदाेलनाचे नियाेजन करण्यात आले आहे. सकाळपासून जपानी गार्डन, बिजलीनगर आणि बालाेद्यानकडून राजभवनाकडे जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालकांनीही या मार्गाचा वापर न करण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. आंदाेलनकर्त्यांनाही राजभवनजवळ येऊ दिले जाणार नाही. नेत्यांच्या भाषणांसाठी सेंटर पाॅईंट शाळेच्या जवळच्या चाैकात व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावर जागाेजागी पाेलीस तैनात राहणार आहेत.
पाेलीस आयुक्त अमितेश कुमार स्वत: बंदाेबस्ताचे नेतृत्व करणार आहेत. आंदाेलनकर्त्यांवर नजर ठेवण्यासाठी गुप्त पाेलिसांना तैनात करण्यात आले आहे. आंदाेलनांची प्रत्येक हालचाल कॅमेऱ्यात टिपण्यात येणार आहे शिवाय एसआरपीच्या दाेन कंपन्यांसह वरूण, वज्र, क्विक रिस्पांस टीम आणि मोबाईल सर्विलांस वाहन तैनात करण्यात येईल. काटाेल मार्ग वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे. काटाेल मार्गाने येणारे वाहनचालक सदर फ्लायओव्हरचा उपयाेग करू शकतील. मात्र, वाहनचालकांना सिव्हील लाईन्सकडे जाण्यासाठी राजभवन मार्गाचा उपयाेग करण्यास मनाई करण्यात आली आहे.