रस्त्यालगत झुडपे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST2021-05-27T04:08:56+5:302021-05-27T04:08:56+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क टाकळघाट : येथील औद्याेगिक परिसरात जाणाऱ्या सिमेंट रस्त्यालगत माेठमाेठी झुडपे वाढली आहे. शिवाय या झाडांमधून विद्युत ...

Shrubs grew along the road | रस्त्यालगत झुडपे वाढली

रस्त्यालगत झुडपे वाढली

लाेकमत न्यूज नेटवर्क

टाकळघाट : येथील औद्याेगिक परिसरात जाणाऱ्या सिमेंट रस्त्यालगत माेठमाेठी झुडपे वाढली आहे. शिवाय या झाडांमधून विद्युत तारा गेल्या असून, वादळ-वारा आल्यास एकमेकांना स्पर्श हाेऊन याठिकाणी धाेका हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, या झुडपांमुळे रस्त्याची रुंदी कमी हाेऊन रहदारीला अडसर ठरत आहे. त्यामुळे ही झुडपे कापणार काेण, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

टाकळघाट ते औद्याेगिक क्षेत्रात जाणाऱ्या सिमेंट रस्त्याची रुंदी दिवसेंदिवस कमी हाेत आहे. या रस्त्यावर झुडपे वाढली असून, जागाेजागी मुरूम व कचऱ्याचे ढिगारे, सरपण आदी पडून आहे. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहनचालकांना माेठा त्रास साेसावा लागत आहे. शिवाय रस्त्यालगतच्या झुडपांमधून विद्युत तारा गेल्या असून, याठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र, याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष हाेत आहे.

औद्याेगिक क्षेत्र बुटीबाेरी व नागपूरला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जाताे. टाकळघाट गावात ये-जा करण्यासाठी हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर २४ तास वर्दळ सुरू असते. असे असतानाही मुख्य रस्त्यालगत वाढलेल्या झुडपांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त हाेत आहे. चारचाकी वाहनचालकांना एकमेकांना साइड देणे कठीण झाले आहे. दुचाकीस्वार गाेंधळून अपघातही घडले आहेत. त्यामुळे टाकळघाट-कान्हाेलीबारा टी-पाॅइंट मार्ग ते कृष्णा नदीपर्यंत रस्त्यावर वाढलेली झुडपे तसेच रस्त्यालगत पडून असलेल्या कचऱ्याची साफसफाई करून रस्ता वाहतुकीसाठी माेकळा करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

....

विद्युत तारांमुळे धाेका

या रस्त्यालगत माेठमाेठी झुडपे वाढली असून, झाडांमधून विद्युत तारा गेल्या आहेत. वारा सुटल्यास तारांचा एकमेकांना स्पर्श हाेऊन शाॅर्टसर्किटमुळे आग लागते. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे अनेक झाडे जळाली हाेती. त्यामुळे याठिकाणी धाेका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून विद्युत तारांमधून गेलेली झुडपे कापावीत, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Shrubs grew along the road