श्रीराम मंदिर ठरणार समाजाचे शक्ती केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:05+5:302021-01-13T04:18:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हिंदू समाज हा सनातन वैदिक धर्म असून, समाजाला संघटित करण्याचे कार्य अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ...

श्रीराम मंदिर ठरणार समाजाचे शक्ती केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू समाज हा सनातन वैदिक धर्म असून, समाजाला संघटित करण्याचे कार्य अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या रूपाने होत आहे. श्रीराम मंदिर हे समाजाचे शक्ती केंद्र ठरणार असल्याची भावना अंजनगाव देवनाथ पीठाचे पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केली.
श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियानांतर्गत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भगीरथ महाराज, श्रीराम जोशी, रामचरण महाराज, संघाचे महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. याप्रसंगी राम मंदिराच्या इतिहासावर आधारित चित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. प्रास्ताविक सनद गुप्ता यांनी केले. संचालन प्रशांत तितरे यांनी केले तर आभार अनिल शर्मा यांनी मानले. यावेळी विहिंपचे विदर्भ प्रांत उपाध्यक्ष डॉ. हेमंत जांभेकर, राजेश्वरी देवी, आ. मोहन मते, महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनिषा धावडे, तेजिंदरसिंग रेणू, विनय चांगदे, रवींद्र बोकारे उपस्थित होते.