श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात चातुर्मास प्रवेश संपन्न
By Admin | Updated: July 23, 2015 02:44 IST2015-07-23T02:44:25+5:302015-07-23T02:44:25+5:30
श्री सुमतिनाथ स्वामी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाद्वारे जैन संतांच्या पवित्र चातुर्मासाचे आयोजन श्री सुमतिनाथ जैन मंदिर, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे.

श्री सुमतिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात चातुर्मास प्रवेश संपन्न
नागपूर : श्री सुमतिनाथ स्वामी जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघाद्वारे जैन संतांच्या पवित्र चातुर्मासाचे आयोजन श्री सुमतिनाथ जैन मंदिर, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. आज जैन मुनिश्री व साध्वींचा चातुर्मास प्रवेश संपन्न झाला. बुधवारी सकाळी भव्य शोभायात्रा गुजरात भवन धंतोली येथून काढण्यात आली. शोभायात्रेत जैन आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांच्यासोबत शिष्य मुनिश्री प्रियदर्शन विजयजी, पुनितचंद्र विजयजी, साध्वी इंद्रवंदिताजी, इंद्रनिधीजी उपस्थित होते. ही शोभायात्रा रामदासपेठेतील प्रमुख मार्गावरून फिरून मंदिरात पोहोचली. आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराजांनी आपल्या शिष्यांसह चातुर्मासात प्रवेश केला. यावेळी सकल जैन समाजाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी सर्व मुनिश्री व साध्वींचे अभिनंदन केले. चातुर्मास समारोहात चार महिने सत्संग, भक्ती, संस्कार शिबिर व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. चातुर्मास समारोहाचे लाभार्थी विजयाबेन शोभागचंद सावडिया परिवार व कन्नूभाई सावडिया परिवार आहे. मुनिश्रींच्या प्रवचनाला गुरुवारपासून प्रारंभ होईल. दररोज सकाळी ९ ते १०.३० प्रवचन होईल. (प्रतिनिधी)
आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांचा आज जन्मदिन
अध्यात्मयोगी आचार्यदेव श्रीमद् विजय कलापूर्ण सुरीश्वरजी म.सा. यांचे शिष्यरत्न आचार्यदेव श्रीमद् विजय पूर्णचंद्र सुरीश्वरजी म.सा. यांचा भव्य चातुर्मास समारोह आराधना भवन, श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर, वर्धमाननगर येथे साजरा करण्यात येत आहे. येथे आचार्यश्री यांचा ५५ वा जन्मदिन गुरुवारी २३ जुलैला संघाद्वारे भक्तिभावाने साजरा करण्यात येईल. यानिमित्त सकाळी ९ ते १०.३० पर्यंत अष्टप्रतिहार्य वंदना करण्यात येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती सकल जैन समाजाचे अध्यक्ष खा. विजय दर्डा यांनी केली आहे.