जिजाऊ ब्रिगेड सेवा संघातर्फे श्रावणाचा बहारदार कार्यक्रम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:11 IST2021-08-20T04:11:16+5:302021-08-20T04:11:16+5:30

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष जया देशमुख, शहर अध्यक्ष अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, स्वाती शेंडे, प्रणाली दळवी, पूजा ...

Shravan's Brave Program by Jijau Brigade Service Team () | जिजाऊ ब्रिगेड सेवा संघातर्फे श्रावणाचा बहारदार कार्यक्रम ()

जिजाऊ ब्रिगेड सेवा संघातर्फे श्रावणाचा बहारदार कार्यक्रम ()

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष जया देशमुख, शहर अध्यक्ष अनिता ठेंगरे, नंदा देशमुख, स्वाती शेंडे, प्रणाली दळवी, पूजा मानमोडे, लीना निकम, सुनीता जिचकार, शरयू तायवाडे, वृंदा ठाकरे, अनिता पांडव, निर्मला मानमोडे, महिला सदस्य दिशा देशमुख, वनिता देशमुख, सोनाली मोहोड, विशाखा पवार, संजीवनी सोमवंशी, रोहिणी बळी उपस्थित होत्या. परीक्षक म्हणून लावणी सम्राज्ञी शिल्पा शाहीर, उद्योजिका शीतल सास्ते यांनी काम पाहिले. यावेळी आयोजित हिरवी जोडी स्पर्धेत पहिला क्रमांक पूजा मानमोडे आणि देवका आजी यांनी मिळविला. दुसरा क्रमांक स्मिता शेंडे, राजश्री चौधरी यांना मिळाला. तर तिसरा क्रमांक मीनल आणि अबोली यांना मिळाला. हिरवी राणी स्पर्धेत पहिला क्रमांक चेतना पडोळे यांनी तर दुसरा क्रमांक रंजना चौधरी यांनी पटकावला. श्रावण संवादमध्ये पहिला क्रमांक सोनाली मोहोड, दुसरा क्रमांक रूपाली टिचकुले यांनी पटकावला. गीतगायन स्पर्धेत दीपा काकडे यांनी बाजी मारली. तर कविता वाचनमध्ये रेखा रेहमतकर यांनी क्रमांक पटकावला. कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेड सेवा संघाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

...........

Web Title: Shravan's Brave Program by Jijau Brigade Service Team ()