शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

राज्यातील जन्मजात कर्णबधिरांसाठी ‘श्रवणीत महाराष्ट्र’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 10:21 AM

‘श्रवणीत महाराष्ट्र’ ही नवी योजना सुरू करण्याची माहिती पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन सोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार यांनी येथे दिली.

ठळक मुद्देविरल कामदार यांची माहिती मेयोच्या ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ओपीडीचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांसाठी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ महत्त्वाचे ठरते. परंतु ‘स्किम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’ या योजनेंतर्गत रुग्णाच्या एकाच कानासाठी हे यंत्र उपलब्ध करून दिले जात आहे. शिवाय, यात शस्त्रक्रियेनंतरच्या आवश्यक देखभालीसाठी विशेष योजना नाही. या संदर्भातील विस्तृत चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली. त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी ‘श्रवणीत महाराष्ट्र’ ही नवी योजना सुरू करण्याची ग्वाही दिली, अशी माहिती पंडित दीनदयाल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, रिसर्च अ‍ॅण्ड ह्युमन सोर्सेसचे संचालक डॉ. विरल कामदार यांनी येथे दिली.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) गुरुवारी उद्घाटन झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे व कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी उपस्थित होते.शासकीय रुग्णालयात ‘आॅडिओलॉजी’ डीग्री व डिप्लोमा सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहितीही यावेळी डॉ. विरल कामदार यांनी दिली. आ. कुंभारे म्हणाले, राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ ओपीडी सुरू होण्याचा मान नागपूरच्या मेयो रुग्णालयाला मिळाला आहे. याचा फायदा रुग्णांना होईल. या विभागासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठीही प्रयत्न केले जाईल, असेही ते म्हणाले.यावेळी आ. डॉ. मिलिंद माने यांनीही आपले विचार मांडले. अधिष्ठाता डॉ. श्रीखंडे यांनी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’बाबत जनसामान्यात जनजागृती करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. वेदी यांनी केले. ते म्हणाले, आठवड्यातून एक दिवस म्हणजे, मंगळवारी कॉक्लीअर इम्प्लांट ओपीडी सुरू राहील. यात बालरोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, आॅडिओलॉजिस्ट व इएनटी तज्ज्ञ एकत्र बसून रुग्णांची तपासणी करून उपचाराची दिशा ठरवतील. यामुळे रुग्णांना एकाच ठिकाणी अद्ययावत उपचार मिळतील.

टॅग्स :Governmentसरकार