श्रावण धारा जोरदार बरसल्या
By Admin | Updated: September 1, 2016 03:05 IST2016-09-01T03:05:08+5:302016-09-01T03:05:08+5:30
श्रावणात अवकाश घेणारा पाऊस उपराजधानीत मुक्कामी आला आहे. आॅगस्टअखेर बसरणाऱ्या श्रावणसरीमुळे शहरातील वातावरणात गारवा पसरला आहे.

श्रावण धारा जोरदार बरसल्या
उपराजधानी भिजली : ८.६ मिमी पावसाची नोंद
नागपूर : श्रावणात अवकाश घेणारा पाऊस उपराजधानीत मुक्कामी आला आहे. आॅगस्टअखेर बसरणाऱ्या श्रावणसरीमुळे शहरातील वातावरणात गारवा पसरला आहे. आॅगस्ट महिन्यात सरासरी २७६.५ मि.मी. नोंद होते. परंतु यावर्षी आॅगस्ट महिन्यात सरासरीच्या ५७ टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली. शेवटच्या दोन दिवसात पाऊस झाला नसता, तर अवस्था वाईट झाली असती.
मंगळवारी रात्रीही शहरात जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दुपारी अचानक विजेच्या कडकडाटासह जवळपास एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. सलग महिनाभरापासून वाढलेल्या उकाड्यामुळे लोक हैराण झाले होते. बुधवारी दुपारी लोकांनी पावसाचा चांगलाच आनंद लुटला. बुधवारी सकाळी ८.३० ते ५.३० पर्यंत शहरात ८.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर मंगळवारी रात्री ३४.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाल्याने अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. (प्रतिनिधी)
गणेश टेकडी मंदिरातील
छप्पर पडले.
बुधवारी झालेल्या पावसामुळे श्रीगणेश टेकडी मंदिराच्या उत्तरेकडील छताचा काही भाग पडला. त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरातील आवागमन बंद करण्यात आले आहे. भाविकांसाठी पूर्व अणि पश्चिमेकडील गेट सुरू केले आहे. मंदिराचे सचिव श्रीराम कुळकर्णी यांनी सांगितले की, पावसामुळे मंदिरातील श्रीराधाकृष्ण मंदिराच्या छताचा काही भाग क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे उत्तरेकडील आवागमन बंद करण्यात आले आहे. ५ सप्टेंबरपर्यंत दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.