शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्रावण हर्डीकरांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2023 20:11 IST

महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे.

आनंद डेकाटे   नागपूर: महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती केली आहे. डॉ. ब्रिजेश दीक्षित यांचा कार्यकाळ संपल्याने या पदाचा पदभार अर्थखात्याचे अतिरिक्त सचिव नितीन करीर यांच्याकडे होता. त्यांच्या नियुक्तीचे आदेश २८ जुलै रोजी काढण्यात आले. हर्डीकर सध्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांना तातडीने त्यांच्या पदाची सुत्रे अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नागपूरमध्ये महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत.

२००५ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असलेले श्रावण हर्डीकर हे ६ जानेवारी २०१५ ते २५ एप्रिल २०१७ या दरम्यान नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. महापालिकेचे आयुक्त हे महामेट्रोचे पदसिद्ध संचालक असतात. त्यामुळे त्यांना मेट्रोच्या कामाची माहिती आहे. मेट्रो टप्पा -२ चे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे त्यांच्यापुढे लक्ष्य असणार आहे. मे २०२३ मध्ये ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोडला होता. महामेट्रोच्या कामाबाबत महालेखाकार यांच्या अहवालात ताशेरे ओढले होते. 

त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊ नये,असे पत्र काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारकडे पाठवले होते. दीक्षित यांच्यानंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती न करता राज्य शासाने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अर्थखात्याचे अतिरिक्त सचिव नितीन करीर यांच्याकडे सोपवला होता. तेव्हापासून मेट्रोची सुत्रे मुंबईतूनच हलविली जात होती. त्यामुळे मेट्रोला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक मिळणार किंवा नाही याबाबत उत्सूकता होती. दीक्षित यांच्या जागी भारतीय रेल्वे सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशीही शक्यता वर्तवली जात होती. पण शासनाने हर्डीकर यांच्या रुपात सनदी अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMetroमेट्रो