शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘एसएमएस’ दाखवा, वीज बिल भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 22:30 IST

अनेकदा वीज बिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीज बिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून वीज बिलाचा भरणा करता येईल.

ठळक मुद्देवाट पाहण्याची गरज नाही : बिल भरण्याचे अनेक पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकदा वीजबिल मिळालेच नसल्याची किंवा उशिरा मिळाल्याची ग्राहकांकडून ओरड होते. हे लक्षात घेऊन वीजबिल तयार होताच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना त्यासंबंधीचा एसएमएस पाठविण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हा एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून वीज बिलाचा भरणा करता येईल.महावितरणकडे केवळ मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यास येणाऱ्या एसएमएसच्या आधारे त्याला त्याच्या वीज बिलांचा भरणा वेळीच करणे शक्य झाले आहे. याशिवाय ठराविक मुदतीत पैसे भरून वीज बिलात मिळत असलेल्या प्रॉम्प्ट पेमेंट सवलतीचा लाभ घेणेही शक्य झाले आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी याबाबत माहिती दिली. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे संपूर्ण राज्यात आक्रमकतेने राबविली जात असून, येणाºया सुट्यांचा काळ बघता वीज बिलाचा भरणा कसा करायचा, असा यक्षप्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत असला तरी बिलांचा भरणा सुलभतेने व्हावा म्हणून ग्राहकांना मोबाईल अ‍ॅप आणि संकेतस्थळावरून आॅनलाईन पद्धतीने शिवाय अनेक सहकारी बँका, महावितरण आणि खासगी वीज बिल भरणा केंद्रांतून विजेचे बिल भरण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून किवा महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहक विजेचे बिल आॅनलाईन पद्धतीने भरू शकतात. क्रेडिट कार्डद्वारे बिलाचा भरणा केल्यास शुल्क आकारण्यात येत असून. उर्वरित इतर सर्व पद्धतींच्या माध्यमातून (नेटबँकिंग, यूपीआय, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅशकार्ड) वीज बिलाचा भरणा केल्यास ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. आॅनलाईन पद्धतीने भरणा केल्यास ग्राहकास त्याच्या नोंदणीकृत मोबाईलवर 'एसएमएस'द्वारे त्वरित पोच मिळते; महावितरणच्या या संकेतस्थळावर पेमेंट हिस्ट्री तपासल्यास वीज बिल भरल्याचा तपशील व पावतीही उपलब्ध होते.अ‍ॅप नसलेल्यांसाठी ‘क्यूआर कोड’ज्या ग्राहकांकडे मोबाईल अ‍ॅप नाही त्यांच्याकरिता महावितरणच्या वीज बिलावर ‘क्यूआर’ (क्वीक रिसपॉन्स) कोड देण्यात आला असून, मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड केलेल्या क्यूआर कोड रीडरच्या माध्यमातून वीज बिलावरील हा कोड स्कॅन करता येतो. त्यावरून महावितरणची मोबाईल अ‍ॅपची लिंकही मिळते. वीज बिलावरील क्यूआर कोड हा अँड्रॉईड, आयओएस, विंडोज मोबाईलसाठी उपलब्ध आहे. सोबतच राज्यातील अनेक भागात प्रायोगिक स्तरावर फिरते वीज बिल भरणा केंद्रही सुरू करण्यात आले असून, साप्ताहिक बाजाराच्या दिवशी या केंद्रावर जाऊन ग्राहकांना वीज बिल भरणा करणे शक्य आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल