शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रामटेक तालुक्यात डीएपी खताची टंचाई; शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:57 IST

काळाबाजार होण्याची शक्यता : पर्यायी खते वापरण्याचा सल्ला

राहुल पेटकर लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : यावर्षी पावसाला आधीच सुरुवात झाल्याने तसेच जमिनीत पुरेसी ओल असल्याने शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. रामटेक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये सध्या डीएपी उपलब्ध नसल्याने या खताचा काळाबाजार होण्याची शक्यता बळावली आहे. डीएपीची रॅक उतरली नसल्याने तालुक्यात या खताची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करावा, असा सल्लाही कृषी विभागाने दिला आहे.

रामटेक तालुक्यात धान व त्याखालोखाल कापसाचे पीक घेतले. तालुक्यात सरासरी ४,४३५ हेक्टरमध्ये कापसाची लागवड केली जाते. या पिकासाठी सुरुवातीला नत्र व स्फुरद या घटकांची आवश्यकता असल्याने तसेच डीएपीमध्ये ४६ टक्के स्फुरद व १८ टक्के नत्र असते. यात प्रोटिन्सयुक्त नत्र असल्याने सुरुवातीला रोपांची वाढ जोमात होते. त्यामुळे शेतकरी याच खताला फार पूर्वीपासून प्राधान्य देतात.

तालुक्यात किमान एक हजार मेट्रिक टन डीएपीची आवश्यकता असून, कृषी विभागाने त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला तर दुकानदारांनी कंपन्यांकडे मागणी नोंदविली आहे. डीएपीची रॅक अजूनपर्यंत उतरली नाही, त्यामुळे तालुक्यात डीएपीची कमतरता जाणवत आहे, अशी माहिती कृषी सेवा केंद्र मालकांनी दिली असून, कृषी विभागाने दुजोरा दिला आहे. 

नफेखोरीसाठी खतांची टंचाईहंगामात खतांची मागणी वाढत असल्याने अधिक मागणी असलेल्या खतांची मुद्दाम टंचाई निर्माण केली जाते. टंचाई निर्माण झाली ही दुकानदार चढ्या दराने खतांची विक्री करून नफा कमावतात. राज्य सरकार व कृषी विभाग खते व बियाण्यांचे लिंकिंग करू नका, असे वारंवार सांगत असले कृषी सेवा केंद्र मालक कुणाचेही ऐकत नाही. त्यांच्यावर जुजबी कारवाया केल्या जातात, असा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, तातडीने पुरेसे डीएपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

"शेतकऱ्यांनी पिकाला आवश्यक असलेले घटक विचारात घेऊन डीएपीला पर्यायी खते वापरावी. यासाठी २५ किलो युरिया व १५० किलो एसएसपी किंवा २५ किलो युरिया व ५० टीएसपी किंवा ३७किलो २४-२४-० व ८७ किलो एसएसपी अथवा ४५ किलो २०-२०-०-१३ व ८७ किलो एसएसपी किंवा १५-१५-१५, १६-१६-१६, १९-१९-१९ या खतासोबत एसएसपी वापरून डीएपीला पर्यायी खत म्हणून शेतकऱ्यांनी वापरावे."- सुनील कोरटे, तालुका कृषी अधिकारी, रामटेक

टॅग्स :FertilizerखतेFarmerशेतकरीfarmingशेतीramtek-acरामटेक