शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भाव आहे, पण विकायला तूर नाही !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 11:15 IST

उत्पादनात घट : १६ लाख टनाचा तुटवडा, ८ लाख टन आयातीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी १० हजार रुपये दर मिळत आहे. हे दर दबावात आणण्यासाठी व आवक वाढविण्यासाठी बाजारात सायकॉलॉजिकल प्रेशर तयार केले जात आहे. देशात उत्पादन घटल्याने यंदा १६ लाख टन तुरीचा तुटवडा जाणवणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी किमान ८ लाख टन तुरीची आयात होण्याची शक्यता असून, समांतर दरामुळे ही आयात महागात पडणार असल्याने दरावर फारसा परिणाम होणार नाही. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार स्टॉक लिमिटवर भर देत आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने वर्ष २०२३-२४ च्या हंगामात ४३ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. वास्तवात, उत्पादन ३० लाख टन झाले असून, देशाची वार्षिक गरज ही ४६ लाख टन तुरीची आहे. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. 

दर पाडणे कठीणआयात करून देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडण्यासाठी केंद्र सरकारने डाळींवरील आयात शुल्क रद्द केले असून, आयातीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मोझांबिक, म्यानमार व मलावी या देशांनी भारताला कमी दरात तूर विकत देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आयात थांबली आहे. त्यामुळे सरकारने स्टॉक लिमिटवर भर दिला असला तरी डाळींच्या जागतिक बाजारातील तेजीमुळे केंद्र सरकारला देशांतर्गत बाजारातील तुरीचे दर पाडणे कठीण जात आहे. जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा ७० टक्के असून देशात कर्नाटक व महाराष्ट्राचा वाटा ५६.८० टक्के आहे.

आयात महाग

जागतिक पातळीवर सध्या तुरीचे दर ९,५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. भविष्यात हे दर कमी होण्याची शक्यता नाही.

पॅकिंग व वाहतूक खर्च विचारात घेता आयात केल्या जाणाऱ्या तुरीला किमान प्रतिक्चिटल १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

२०२३-२४ मध्ये भारताने ७.७५ लाख टन तूर आयात केली होती. चालू वर्षात अधिकाधिक ८ लाख टन आयात होऊ शकते.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी