काेराेना लसीकरणाला अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:17+5:302021-04-06T04:09:17+5:30
पिपळा (डाक बंगला) : इसापूर (ता. सावनेर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत साेमवारी (दि. ५) काेराेना लसीकरण शिबिराचे ...

काेराेना लसीकरणाला अल्प प्रतिसाद
पिपळा (डाक बंगला) : इसापूर (ता. सावनेर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत साेमवारी (दि. ५) काेराेना लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या शिबिरात केवळ ६८ नागरिकांनी लसीकरण करवून घेतले. गावातील ज्येष्ठ व ४५ ते ५९ वर्षे वयाेगटातील नागरिकांची संख्या आणि दाेन काेराेनाबाधितांचा मृत्यू लक्षात घेता, या शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा अल्प असल्याचे स्पष्ट हाेते.
शिबिरात ६८ नागरिकांना देण्यात आलेला काेराेना लसीकरणाचा पहिलाच डाेज हाेता. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप अप्पा यांच्या मार्गदर्शनात आरोग्यसेवक अनिल येवले व परिचारिका पटोडे यांनी लसीकरणाला सुरुवात केली. यावेळी सरपंच मालती खोकले, उपसरपंच विकास सलोडकर, ग्रामसेवक दिलीप हेडाऊ, ग्रामपंचायत कर्मचारी अल्केश ढेपे, रोजगार सेवक अभिजित ठाकरे, अंगणवाडीसेविका उषा ठाकरे, आशा सेविका मंगला निंडेकर, संगीता इंगुलकर यांनी गावकऱ्यांना लसीकरण करण्याबाबत आवाहन केले हाेते. त्यासाठी गावात जनजागृती माेहीमही राबवण्यात आली हाेती. इसापूर येथे काेराेना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. त्यातच दाेघांचा काेराेनामुळे मृत्यूही झाला. यात वेकाेलि कर्मचारी व एका ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. गृह विलगीकरणातील काेराेनाग्रस्त घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या हाेत्या. अशा रुग्णांवर पाेलीस कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.