दुकानदारांनी काेराेना टेस्ट करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:12 IST2021-03-04T04:12:01+5:302021-03-04T04:12:01+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खापा (ता. सावनेर) शहरातील सर्व दुकानदार, भाजीपाला, दूध, ...

Shopkeepers should test Kareena | दुकानदारांनी काेराेना टेस्ट करावी

दुकानदारांनी काेराेना टेस्ट करावी

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खापा (ता. सावनेर) शहरातील सर्व दुकानदार, भाजीपाला, दूध, वृत्तपत्र विक्रेते, गॅस सिलिंडर घराेघरी पाेहाेचविणारे कर्मचारी व व्यावसायिकांनी स्वत:हून न घाबरता काेराेनाची टेस्ट करवून घ्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी पालिकेच्या सभागृहात आयाेजित विशेष बैठकीत केले.

काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांवर चर्चा करण्यासाठी खापा नगर परिषदेच्या सभागृहात आयाेजित केलेल्या बैठकीला तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत वाघ यांच्यासह महसूल व आराेग्य विभागाचे तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. काही दुकानदार, भाजीपाला, दूध, वृत्तपत्र विक्रेते, गॅस सिलिंडर घराेघरी पाेहाेचविणारे कर्मचारी काेराेना सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे त्यांनी स्वत:साेबतच त्यांच्या कुटुंबीयांची व इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी त्यांनी स्वत:हून काेराेनाची टेस्ट करवून घ्यावी. लग्नसमारंभात हाेणारी गर्दी काेराना संक्रमणास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी. लग्नसमारंभात सहभागी हाेणाऱ्यांनी आधी काेराेनाे टेस्ट करून सहभागी व्हावे. त्यांनी इतरांनाही काेराेना टेस्ट करण्यासाठी तसेच नियमित मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य उपाययाेजनांचे पालन करण्याबाबत इतरांना प्राेत्साहित करावे, असेही डाॅ. ऋचा धाबर्डे यांनी सांगितले. दुकानदारांनी ‘मास्क नाही तर सामान नाही’ हे अभियान राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Shopkeepers should test Kareena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.