शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धक्कादायक! महिलेने बनवली मित्राच्या पत्नीची अश्लील चित्रफीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 15:06 IST

मध्यप्रदेशातील इंदोरची एक महिला तिच्या मित्राच्या पत्नीला आपल्या घरी बोलवून घेते. तिची बडदास्त ठेवते. ती विश्वासाने त्या घरात एकदा कपडे बदलत असताना तिची नको त्या अवस्थेतील चित्रफीत मोबाईलमध्ये तयार करते.

ठळक मुद्देकुरियरने पाठविली सीडी आणि धमकी पत्रइंदोरच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्यप्रदेशातील इंदोरची एक महिला तिच्या मित्राच्या पत्नीला आपल्या घरी बोलवून घेते. तिची बडदास्त ठेवते. ती विश्वासाने त्या घरात एकदा कपडे बदलत असताना तिची नको त्या अवस्थेतील चित्रफीत मोबाईलमध्ये तयार करते. आठ महिन्यानंतर या चित्रफीतीची सीडी संबंधित विवाहितेला कुरियरने पाठविते. हा व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी देते. एखाद्या सिरियलचे कथानक वाटणारी ही रियल स्टोरी नागपूर ते इंदोर दरम्यानची आहे. या प्रकरणाने केवळ दोन कुटुंबातच नव्हे तर दोन राज्याच्या पोलीसांमध्येही वाद निर्माण केला होता.पती, पत्नी आणि ती, असा तिहेरी कंगोरा या गुन्ह्यातील घटनाक्रमाशी जुळलेला आहे. तक्रार करणारी महिला (वय ३५) अजनीत राहते. तर, आरोपी महिला दीपमाला चेतन चौधरी मध्यप्रदेशमधील इंदोरच्या नंदानगरातील रहिवासी आहे. तक्रार करणा-या महिलेचा पती आणि आरोपी महिला दीपमाला चौधरी हे मार्केटींग फिल्डमध्ये सोबत काम करताना त्यांच्यात स्रेहाचे संबंध होते. त्यामुळे एकमेकांच्या घरी जाणे-येणेही होते. १३ नोव्हेंबर २०१७ ला पीडित महिला आरोपी दीपमालाच्या इंदोरमधील घरी गेली होती. त्यावेळी चेंजिंग रूममध्ये मोबाईल लपवून ठेवून, तक्रार करणाऱ्या महिलेचा कपडे बदलविताना दीपमालाने व्हिडीओ तयार केला. नंतर पीडित महिलेचा पती आणि दीपमालाचे संबंध बिघडले. त्यामुळे दीपमालाने आधीच मोबाईलमध्ये तयार करून ठेवलेल्या अश्लिल चित्रफीतीची सीडी तयार केली. २३ जुलै २०१८ ला पीडित महिला तिच्या घरी असताना तिला एक कुरियर मिळाले. या कुरियरमध्ये मनोहर कहानिया (पुस्तक), धमकीपत्र तसेच एक सीडी होती. महिलेने ती सीडी लावून बघितली असता तिला जबर मानसिक धक्का बसला. त्यात तिच्या एकांत क्षणाचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ होता. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी दीपमाला चौधरीने पीडित महिलेला धमकी पत्रातून दिली होती. त्यामुळे पीडित महिलेने अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांची टोलवाटोलवीअश्लील व्हिडीओ इंदोरला बनविण्यात आल्यामुळे अजनी पोलिसांनी ते प्रकरण तपासासाठी तीन आठवड्यांपूर्वी मध्यप्रदेश (इंदोर) पोलिसांना पाठविले. इंदोर पोलिसांनी घटनाक्रम बघून महिलेला नागपूरात लज्जा निर्माण झाल्याचा युक्तीवाद करून तेथेच गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. तेथून पुन्हा ते प्रकरण नागपूर पोलिसांकडे परत आले. हे प्रकरण कानावर जाताच उपायुक्त निलेश भरणे यांनी लगेच अजनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या प्रकरणी गुरुवारी आरोपी दिपमाला चौधरीविरुद्ध अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.महिलेच्या पतीविरुद्ध तक्रारतपासादरम्यान, या प्रकरणात पुन्हा एक नवा पैलू उघड झाला आहे. त्यानुसार, दीपमालाने इंदोर पोलिसांत पीडित महिलेच्या पतीविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. ‘त्याच्याकडून’ आपला शारिरिक आणि मानसिक छळ होत असल्याचे दीपमालाने त्या तक्रारीत नमूद केले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. त्यामुळे अजनी पोलिसांकडून दीपमालाविरुद्ध आणि इंदोर पोलिसांकडून तक्रारदार महिलेच्या पतीविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

 

टॅग्स :crimeगुन्हे