शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

धक्कादायक; राज्यात भारनियमनाचे दिवस परत येणार? दोन दिवसांपुरताही कोळसा शिल्लक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 7:00 AM

Nagpur News देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही.

ठळक मुद्देराज्यातील वीज केंद्रांतील स्थिती आणखी बिघडली

कमल शर्मानागपूर : देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. महाजेनकोच्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. परिणामी १०,२१२ मेगावॉट विजेच्या उत्पादन क्षमतेच्या तुलनेत केवळ ५५३८ मेगावॉट इतकेच उत्पादन होत आहे. दुसरीकडे महावितरणने नागरिकांना सकाळी व सायंकाळी वीज बचत करण्याचे आवाहन करत भारनियमन सुरू होण्याचे संकेतसुद्धा दिले आहेत.

राज्यभरातील वीज केंद्रांमध्ये जवळपास २० दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असतो. पावसाळ्यात हा स्टॉक ५ ते ७ दिवसांपर्यंत येतो. परंतु यावर्षी हा स्टॉक यापेक्षाही कमी झाला आहे. ३ दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर त्याला अतिसंवेदनशील परिस्थिती मानली जाते. वीज केंद्रांसाठी ही धोक्याची घंटा असते. अशा स्थिती कोळसा पुरवठा होण्यास थोडीही अडचण आली तर वीज केंद्र बंद पडू शकते. महाजेनकोचे म्हणणे आहे की, यंदा चांगला पाऊस झाला. खुल्या खदाणींमध्ये पाणी भरले. त्यामुळे कोळशांचे उत्पादन प्रभावित झाले. परिणामी कोळसा पुरवठा होत नाही आहे. सध्या चंद्रपूरमध्ये सर्वाधिक १.६४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. कोराडी, नाशिक, भुसावळ व खापरखेडा येथे एक दिवस आणि इतर वीज केंद्रांमध्ये त्यापेक्षाही कमी दिवसाचा साठा शिल्लक आहे. खासगी वीज केंद्रातील परिस्थितीही सारखीच आहे. अशा परिस्थितीत अनेक वीज संच बंद पडले आहेत.महाजेनकोच्या वीज केंद्रातील स्थितीकेंद्र -      उपलब्ध कोळसा -                  किती दिवसकोराडी      (६६०) १६१०० मेट्रीक टन -          ०.६ दिवसकोराडी      (२१०) ४१६५ मेट्रीक टन-           १.१९ दिवसनाशिक -            ८२३६ मेट्रीक टन-              १.१८ दिवसभुसावळ -             २८,७३० मेट्रीक टन-          १.३४ दिवसपरळी -                ९६७५ मेट्रीक टन -            ०.७२ दिवसपारस -                ६९४८ मेट्रीक टन-              ०.७७ दिवसचंद्रपूर -                 ८६,२६४ मेट्रीक टन-            १.६४ दिवसखापरखेडा -                 ३१,२५८ मेट्रीक टन-          १.३ दिवस-------------------------------एकूण - १,९१,३४७ मेट्रीक टन

टॅग्स :electricityवीज