शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

धक्कादायक! दोन वर्षांत १२ हजारांचे झाले ४४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 1:33 PM

एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देश्री रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटीच्या अधिकाऱ्यांची धमाल पाच वर्षांपासून हवाला व्यावसायिकांसोबत संबंध

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी अर्बन क्रेडिट सोसायटीतील अधिकाऱ्यांच्या अफरातफरीत नागपुरातील हवाला व्यावसायिक पाच वर्षांपासून सहभागी होते, हे उघड झाले आहे. या हवाला व्यावसायिकांनी आपल्या ओळखींच्या अनेकांना बँकेचे खातेधारक बनविले; नंतर याच खातेधारकांना मामा बनवून त्यांच्या खात्यातून कोट्यवधींचे ट्रान्झक्शन केले. अशातीलच एका महिन्याला ५०० रुपये जमा करणाऱ्या खातेधारकाच्या खात्यात सोसायटीचे अधिकारी आणि हवाला व्यावसायिकांनी तब्बल ४४ कोटींची उलाढाल केल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.मनिलॉन्ड्रिंग प्रकरणात गुंतलेल्या उपरोक्त संस्थेचा माजी व्यवस्थापक मच्छिन्द्र खाडे तसेच अन्य तिघांना अंमलबजावणीसंचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. असेच एक प्रकरण ज्याची गुन्हे शाखेकडे तक्रार झाली आहे, ते लोकमतच्या हाती लागले. ही तक्रार करणारा रुपेश नामक तरुण शांतिनगरात राहतो. त्याची आर्थिक स्थिती जेमतेम आहे. हवालाच्या व्यवहारात गुंतल्याचा संशय असलेल्या विक्रम नामक तरुणाने रुपेशला दोन वर्षांपूर्वी या सोसायटीत खाते उघडण्यास बाध्य केले. माझे बचत खाते याच सोसायटीत आहे. तेथे चांगले व्याज मिळते, अशी थाप विक्रमने मारली. रुपेशने होकार देताच सोसायटीच्या एका अधिकारी व एजंटला बोलवून काही फॉर्मवर रुपेशच्या सह्या घेतल्या. त्यानंतर सोसायटीच्या एजंटस्कडे रुपेशचे पॅनकार्डच्या झेरॉक्स दिल्या. त्यानंतर रुपेश विक्रमने पाठविलेल्या एजंटकडे दर महिन्याला ५०० रुपये जमा करीत होता. दोन वर्षांत दाम दुप्पट रक्कम मिळेल, असे ठरले होते. त्यामुळे मे २०१६ मध्ये रुपेशने सोसायटीत जाऊन आपले आपले बँक स्टेटमेंट तपासले असता त्याला प्रचंड धक्का बसला. रुपेशने लोकमतला सांगितल्याप्रमाणे त्याच्या खात्यातून दोन वर्षांत चक्क ४४ कोटींची उलाढाल करण्यात आली होती. एकेक व्यवहार लाखोंचा होता. ते स्टेटमेंट पाहून रुपेशला दरदरून घाम फुटला. ५०० रुपये महिन्याच्या हिशेबाने दोन वर्षांत १२ हजार रुपये जमा व्हायला हवे होते.मात्र, रुपेशच्या खात्यात ४४ कोटींची उलाढाल अन् लाखोंची रक्कम जमा असल्याचे पाहून तो चक्रावला. तो विक्रमकडे गेला आणि याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने आपण सर्व सांभाळून घेऊ, आपले वरपर्यंत संबंध असल्याची बतावणी करून विक्रमने रुपेशला शांत केले. मात्र, त्याच्यावरून विश्वास उडाल्याने रुपेशने आपले खाते १७ मे २०१६ ला बंद केले.... म्हणून झाली तक्रार!विक्रम हे प्रकरण सांभाळून घेईल, असे वाटल्याने रुपेश शांत झाला. मात्र, रुपेशच्या खात्यातील कोट्यवधींची उलाढाल प्राप्तिकर खात्याच्या नजरेत आली. त्यामुळे प्राप्तिकर खात्यातून गेल्या वर्षी रुपेशला नोटीस आली. ती नोटीस घेऊन रुपेश पुन्हा विक्रमकडे गेला. आधीसारखेच थातूरमातूर उत्तर मिळत असल्याचे पाहून रुपेश घाबरला आणि त्याने २८ मे २०१८ ला पोलिसांकडे तक्रार केली. या सविस्तर तक्रारीत रुपेशने विक्रम तसेच सोसायटीत सहभागी असलेल्या घोटाळेबाजांच्या अफरातफरीची माहिती पोलिसांकडे दिली. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे तपासाला आहे. रुपेशसारखेच अनेक तक्रारदार पोलिसांकडे पोहोचले. मात्र, एवढे गंभीर प्रकरण असूनही पोलिसांकडून तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करण्याची तत्परता दाखविण्यात आली नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजी