शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 9:41 PM

सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकलमधील ‘कोव्हीड-१९’ वॉर्डात दाखल केले. आज त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्देदोन संशयित मृताचा अहवाल निगेटिव्हमेयो, मेडिकलमधील ५९ नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी एकाच दिवशी कोरोना विषाणूची लागण झालेल्या ६ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २५ वर गेली आहे. हे रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यात ८ व १२ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या सर्वांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी कोरोना संशयित म्हणून मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. सतरंजीपुऱ्यातील कोरोना संशयित ६८ वर्षीय इसमाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. या रुग्णाचे नमुने ६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आले. त्याच दिवशी त्यांच्यासोबत राहणारा ३० वर्षीय मुलगा, त्याची २१ वर्षीय पत्नी, मृतकाचा ३५ वर्षीय जावई त्याची ३४ वर्षीय पत्नी व त्यांचे ८ व १२ वर्षाची दोन मुले असे एकूण ६ संशयितांना मेडिकलमधील ‘कोव्हीड-१९’ वॉर्डात दाखल केले. आज त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले. एकाच दिवशी कोरोनाचे ६ नमुने पॉझिटिव्ह येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सर्वांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शुक्रवारी मेयो व मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नागपुरातील ५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. -मेडिकलमध्ये ४४ रुग्ण संशयितमेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये २१ संशयित रुग्ण भरती आहेत. तीन नवीन तर १८ जुने रुग्ण आहेत. यात १५ पुरुष व ६ महिला आहेत. वॉर्ड ४९ मध्ये एकूण २३ संशयित रुग्ण आहेत. यात ११ पुरुष, १० महिला व दोन लहान मुले आहेत. एकूण ४४ संशयित रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २३ रुग्णाचाही यात समावेश आहे. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.-चार दिवसानंतर बाधिताच्या नमुन्यांची चाचणी मृतकाचे नमुने पॉझिटिव्ह येताच त्याच दिवशी त्यांच्या घरातील सहा जणांना मेडिकलमध्ये दाखल केले. परंतु त्यांच्या नमुन्याचा अहवाल यायला चार दिवसांचा कालावधी लागला. पॉझिटिव्ह आलेल्या या रुग्णांचे आधिच नमुने तपासले गेले असते तर आतापर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासून यांचीही साखळी खंडीत करता आली असती, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.-त्या दोघांचा मृत्यू निमोनिआमुळे कोरोना संशयित म्हणून गुरुवारी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या दोन्ही मृतकाचे नमुने निगेटिव्ह आले. यात एक पारशिवनी येथील १२ वर्षाचा मुलगा तर नागपुरातील ५८ वर्षीय पुरुष होता. दोघांना विविध आजारासोबतच निमोनिआ असल्याचे निदान झाले. याच आजारामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असावा, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस