शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

धक्कादायक : विदेशात पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमध्ये अ‍ॅल्युमियम फॉईल्स ऐवजी रेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 22:57 IST

न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठविण्यात येणाऱ्या अल्युमिनियम फॉईल्स काढून त्या बॉक्समध्ये ट्रेलरचालकाने रेती माती भरून ती विदेशात पाठविण्याचा प्रयत्न केला. केवळ कंपनीचेच नव्हे तर देशाचे नाव विदेशात खराब करू पाहणारा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आणि दिल्ली येथे विकलेले लाखोंचे अल्युमियम जप्त केले.

ठळक मुद्देन्यूयॉर्कला जाणार होते बॉक्स४७ लाखांच्या मालाची अफरातफरआरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठविण्यात येणाऱ्या अल्युमिनियम फॉईल्स काढून त्या बॉक्समध्ये ट्रेलरचालकाने रेती माती भरून ती विदेशात पाठविण्याचा प्रयत्न केला. केवळ कंपनीचेच नव्हे तर देशाचे नाव विदेशात खराब करू पाहणारा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली आणि दिल्ली येथे विकलेले लाखोंचे अल्युमियम जप्त केले.मौदा येथील हिंडाल्को इंडस्ट्रीजने न्यूयॉर्क येथील आयएफसी इंटरनॅशनल फेस कॉर्पोरेशनला पाठविण्याकरिता २१ लाकडी बॉक्समध्ये अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स कंटेनरमध्ये भरल्या होत्या. प्रत्येक बॉक्समध्ये ७२० किलोच्या फॉईल्स होत्या. आरोपी कंटेनर क्रमांक ओएलयू ०७६९५४३ मधून १७९३१ किलो अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स चोरल्या आणि त्यात रेती माती भरली. हे कंटेनर नरेंद्रनगरातील भारती कॉर्पोरेशन लिमिटेडमधून रवाना होणार होते. मात्र, पॅकिंगचा संशय आल्याने चौकशी केली असता आरोपी ट्रेलरचालक पांडे याने ही चोरी केल्याचे उघड झाले. त्याने काढलेल्या अ‍ॅल्युमिनियमची किंमत ४६ लाख, ८२ हजार, २८८ रुपये आहे. आरोपी पांडेने ही बनवाबनवी १४ डिसेंबरच्या रात्री १०. ३० वाजतापासून तो १५ डिसेंबरच्या सकाळी ८ वाजता दरम्यान केली. मात्र, त्याची फसवेगिरी उघडकीस आल्यानंतर शनिवारी, २९ डिसेंबरला २०१८ ला राकेश रामप्रेम गुप्ता (वय ३८) यांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालक सर्वतीकुमार पांडे याची चौकशी सुरू केली. १४ डिसेंबरच्या रात्री कंटेनरचा मार्ग आणि त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता कळमन्यातील एचबी टाऊन चौकातून कंटेनर कळमन्याकडे आणि तेथून खसाळा मसाळा येथील एका गोदामात नेण्यात आल्याचे दिसले. पोलिसांनी त्या गोदामात छापा मारून तेथे दडवून ठेवण्यात आलेले अल्युमिनियम फॉइलचे २ बॉक्स जप्त केले. त्याच ठिकाणाहून १९ बॉक्स दुसरीकडे नेण्यात आल्याचेही पोलिसांना कळले.या माहितीसोबतच आरोपी पांडे आणि त्याच्या साथीदारांची नावेही पोलिसांना कळली आणि ते छत्तीसगडमधील रायपूरला पळाल्याचेही कळले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी अजनी पोलिसांचे पथक रायपूरला रवाना केले. मात्र, पांडे आणि त्याचे साथीदार पोलीस पोहोचण्यापूर्वीच हॉटेलमधून पळून गेले. दरम्यान, आरोपींनी अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स रायपुरातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून दिल्लीला पाठविल्याचेही पोलिसांना कळाले. पोलिसांनी लगेच दिल्लीतील सेक्टर ४ मध्ये, बी ब्लॉक, बवाना इंडस्ट्रीयल एरियात जाऊन तेथून १९ बॉक्स जप्त केले. आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागले नाही. पोलीस उपायुक्त भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली अजनीचे ठाणेदार एच. एल. उरलागोंडावार, पोलीस निरीक्षक ए. पी. सिद, एपीआय अहेरकर, पीएसआय वाय. व्ही. इंगळे, हवालदार सिद्धार्थ पाटील, शैलेष बडोदेकर, भागवती ठाकूर, संजय मनस्कर, मनोज काळसर्पे, आशिष राऊत, देवचंद थोटे, दीपक तरेकर यांनी बजावली.मौदा ते नागपूर ११ तासांचा प्रवासआरोपी पांडेने त्याच्या ताब्यातील माल चोरण्याचा कट आधीच रचला होता. त्याचमुळे मौदा येथील कंपनीच्या आवारातून १४ डिसेंबर २०१८ च्या रात्री १०.२० वाजता निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता कंटेनर नरेंद्रनगरात पोहोचला. हीच बाब प्राथमिक तपासात पोलिसांना तपासाचा धागा देणारी ठरली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी