शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आरोग्य योजना, कोट्यवधीचा खर्च तरीही राज्यात दर महिन्याला हजारावर नवजात बालकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 17:35 IST

Nagpur : १ ते ५ वर्षे वयोगटात बालकांच्या मृत्यूमध्ये ९ टक्क्यांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधींचा खर्च, लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही महाराष्ट्रात बालमृत्यूचे प्रमाण चिंताजनकरीत्या आहे. ४३ महिन्यांत ४३,६६२ नवजात बालकांच्या म्हणजे दर महिन्याला एक हजाराहून अधिक मृत्युची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे १ ते ५ वर्षाच्या मुलांतील मृत्यूदरात ९.५४ टक्क्यांची वाढ झाल्याने चिंता आणखी वाढली आहे.

शासनाने बालकांसाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ अॅम्ब्युलन्सची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ्य मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सेवा व मानवविकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, मोफत औषधी व मोफत प्रवासही दिला जातो.

त्यानंतरही शून्य ते १ आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. 

११,५६० नवजात बालकांचा मृत्यू मागील वर्षी

सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, शून्य ते १ वर्षे वयोगटात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत १४,९३८, एप्रिल २०२३ ते २०२४ या कालावधीत ११,८४९, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ११,५६० तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ५,३१५ म्हणजे ४३ महिन्यांत तब्बल ४३,६६२ बालकांचा मृत्यू झाला.

१ ते ५ वर्षे वयोगटात ७,३८५ मृत्यू

१ ते ५ वर्षे वयोगटात एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत २,२१२ एप्रिल २०२३ ते २०२४ या कालावधीत १,९६१, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत २,१६८ तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १,०४४ म्हणजे ४३ महिन्यांत तब्बल ७,३८५ बालकांचा मृत्यू झाला.

एक हजार नवजात शिशूमध्ये ११ मृत्यू

उपलब्ध माहितीनुसार, राज्यात ० ते २८ दिवसांच्या १००० नवजात शिशूमध्ये मृत्यूचा दर ११ आहे. ० ते १ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये मृत्यूदर १४ तर ५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये मृत्यूचा दर १६ आहे. विशेष म्हणजे, केरळमध्ये ५ वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर ६ असताना महाराष्ट्रातील आकडेवारी धक्कादायक आहे.

मृत्यूची ही आहेत कारणे

बालरोग तज्ज्ञांनुसार, ० ते १ वर्षे वयोगटात नवजात शिशूच्या मृत्यू मागे अकाली जन्म (प्री-मॅच्युरिटी), कमी वजन, जन्मवेळी श्वसनाची समस्या, अस्वच्छ ठिकाणी प्रसूती, सेप्सिस, न्यूमोनिया, मेंजायटीस सारखी इन्फेक्शन्स ही कारणे आहेत तर, १ ते ५ वर्षे वयोगटात न्यूमोनिया, जुलाब, कुपोषण, जन्मजात दोष व अपघात ही काही मुख्य कारणे आहेत.

"शहरांमध्ये बालरोग तज्ज्ञ जवळपास ७० ते ७५ टक्के असताना गाव-खेड्यात त्यांची संख्या केवळ २५ ते ३० टक्के आहे. ही संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे. याशिवाय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणे, तंत्रज्ञांची आणि प्रशिक्षित हेल्थ वर्करची मोठी कमतरता आहे. गाव-खेड्यातून रुग्णांना शहरात पाठवण्यासाठी अद्ययावत सोयीसुविधांचा अभाव, हेदेखील बालमृत्यूला कारणीभूत आहे. सरकारने या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे."- डॉ. वसंत खळतकर, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming Infant Mortality Rate in Maharashtra Despite Crores Spent on Healthcare

Web Summary : Despite government health schemes, Maharashtra faces a high infant mortality rate. Over 43 months, 43,662 newborns died. Mortality in 1-5 year olds increased by 9.54%. Lack of specialists in rural areas and inadequate facilities contribute to the crisis.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरHealthआरोग्य