शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

धक्कादायक! घरातच पडून राहिला पॉझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 9:45 AM

सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुपारी १२.३० नंतर मनपाच्या शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांनीच मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातील एका कोपऱ्यात ठेवून, इतर सर्वजण घराबाहेर मृतदेह नेणाऱ्या शववाहिकेची वाट बघत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बाबतीत रुग्णालयांकडून दाखविण्यात येत असलेल्या असंवदेनशीलतेमुळे एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने घरातच प्राण सोडले. सोमवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह दुपारी १२.३० नंतर मनपाच्या शववाहिकेतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांनीच मृतदेहाला प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घरातील एका कोपऱ्यात ठेवून, इतर सर्वजण घराबाहेर मृतदेह नेणाऱ्या शववाहिकेची वाट बघत होते.ही घटना दक्षिण नागपुरातील मित्रनगर येथील आहे. येथे राहणाऱ्या कृपाबाई सुरेंद्रसिंग राठोड यांची रविवारी सकाळी १० वाजता प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना सक्करदरा येथील एका रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांनी भरती करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर बेसा रोड व ओंकारनगर चौक येथील एका खासगी रुग्णालयात नेले असता, त्यांनीही भरती करून घेण्यास नकार दिला. दरम्यान, रु ग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी होत होती. हॉस्पिटल रुग्णाला भरती करून घेत नसल्यामुळे नातेवाईकांनी ९५०० हजार रुपयांचे ऑक्सिजन सिलिंडर आणले. परंतु त्याचाही काहीच परिणाम होत नसल्याने दुपारी ३ वाजता १०८ क्रमांकावर संपर्क करून अ‍ॅम्ब्युलन्स मागितली.

ती अ‍ॅम्ब्युलन्स रात्री ८ वाजता आली. त्यात एक डॉक्टर होती. तिने वरवर बघून सांगितले की, मेयो आणि मेडिकलमध्ये भरती करण्यास जागाच नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रात्री १० वाजता लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये विचारण्यास गेले. त्यांनी कोरोनाचा रिपोर्ट मागितला. अखेर एका पॅथॉलॉजीशी संपर्क करून १५०० रुपयांमध्ये रिपोर्ट मिळविला. हा रिपोर्ट आणि रुग्ण घेऊन नातेवाईक लता मंगेशकर हॉस्पिटलला पोहचले. परंतु व्हेंटिलेटर नसल्याचे कारण सांगून त्यांनीही रुग्णाला भरती करून घेण्यास नकार देत परत पाठविले. अखेर रात्री २ वाजता रुग्णाला घरी आणण्यात आले. साडेतीन वाजताच्या सुमारास रुग्णाने जीव सोडला.रुग्णाला घरी सोडून देण्यास अ‍ॅम्ब्युलन्सवाला अडलारुग्णाच्या अडचणीचा फायदा घेत रात्री १ वाजता अ‍ॅम्ब्युलन्सवाल्यानेही अडवणूक केली. अ‍ॅम्ब्युलन्स चालक म्हणाला की माझे काम रुग्णालयापर्यंत घेऊन जायचे आहे. घरी सोडायचे नाही. तो रुग्णाला अ‍ॅम्ब्युलन्समधून उतरविणार तेवढ्यातच एका खासगी अ‍ॅम्ब्युलन्सने ३००० रुपयात सोडून देतो, असे सांगितले. पैसे देत असल्याचे पाहून त्या अ‍ॅम्ब्युलन्स चालकाने १५०० रुपये घेऊन सोडून दिले.एकाही रुग्णालयात जागा नव्हतीरुग्णाला घरी घेऊन आल्यानंतर नातेवाईकांनी रात्री २ वाजेपर्यंत शहरातील सर्वच खाजगी रुग्णालयात संपर्क करून व्हेंटिलेटर असल्याबद्दल विचारणा केली. मात्र सर्वांकडूनच नकार आला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस