शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ४ वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

By दयानंद पाईकराव | Updated: May 4, 2024 17:29 IST

आरोपीस अटक : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने केले अश्लील कृत्य

नागपूर : अंकल-अंकल म्हणून नेहमीच खेळण्यासाठी घरी जात असलेल्या चार वर्षांच्या चिमुकलीवर नराधम युवकाची वाईट नजर गेली. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्रास होत असल्याने चिमुकलीने आपल्या आईला आपबिती सांगितली अन् आरोपीचे बिंग फुटले. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पोलिसांनी आरोपी नराधम युवकाला अटक करून गजाआड केले आहे.

शेख शहजाद शेख शाहिद (१९, रा. भरमा, जि. शिवनी, मध्यप्रदेश, ह. मु. एमआयडीसी नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. तो एका वेल्डींगच्या दुकानात काम करतो. आरोपी आणि पिडीत चार वर्षांची चिमुकली आपल्या आईवडिलांसह एकाच घर मालकाकडे किरायाने राहतात. चिमुकलीची आई गृहिणी असून वडिल आॅटोचालक आहेत. शेजारीच राहत असल्यामुळे चिमुकली नेहमीच खेळता-खेळता आरोपी नराधमाच्या खोलीत जात होती. तो नेहमी तिला चॉकलेट देऊन खोलीत तिच्यासोबत खेळत होता. दरम्यान आरोपीने दोन-तीन वेळा चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले.

आरोपीने अश्लील कृत्य केल्यामुळे चिमुकलीला त्रास होत होता. शुक्रवारी रात्री चिमुकलीला त्रास होत असल्यामुळे आरोपीने केलेले अश्लील कृत्य आपल्या आईला सांगितले. चिमुकलीने सांगितल्यानंतर तिच्या आईच्या पायाखालील वाळुच सरकली. तिच्या आईने लगेच आपल्या चिमुकलीला घेऊन एमआयडीसी ठाण्यात तक्रार दिली. एमआयडीसी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बनसोड यांनी आरोपी विरुद्धकलम ३७६ (ए, बी), ३७६ (२) (एन), सहकलम ४, ६ पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर