शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
3
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
4
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
5
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
6
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
7
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
8
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
9
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
11
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
12
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
13
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
14
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
15
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
16
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
17
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
18
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
19
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
20
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

धक्कादायक ! नागपुरात वर्षभरात २३२ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 19:37 IST

उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देरस्ते अपघातांचा अनोखा योगायोग : २०१६-२०१७ मध्ये अपघातांची संख्या एकचट्रकच्या धडकेत ५९ बळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. २०१७ मध्ये शहरात १३०० हूून अधिक अपघात झाले व त्यात २३२ नागरिकांचा मृत्यू झाला. या कालावधीत सर्वात जास्त अपघात दुचाकी वाहनांचे झाले तर ट्रकमुळे चक्क ५९ जणांना आपला जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारांतर्गत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेशी संबंधित निरनिराळ्या बाबींबद्दल विचारणा केली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ कालावधीत शहरात किती अपघात झाले, यातील मृत-जखमींचा आकडा, सिग्नल तोडणे तसेच ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची प्रकरणे इत्यादी प्रश्नांचा समावेश होता. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत १ हजार ३७३ अपघात झाले व २३२ नागरिकांना जीव गमावावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे २०१६ सालीदेखील अपघातांचा आकडा हा १ हजार ३७३ इतकाच होता. त्यामुळे हा एक अनोखा योगायोगच आहे. दरम्यान, २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये बळींची संख्या घटल्याचे दिसून आले. शहरात रिंगरोड वर्षभरात ९१ अपघातांची नोंद झाली व यात ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला.हेल्मेट न घालणाऱ्यांकडून दोन कोटींचा दंड वसूलशहरातील नागरिकांमध्ये वाहतूक नियमांप्रती गंभीरता नसल्याची बाबदेखील समोर आली आहे. २०१७ मध्ये शहरात सिग्नल तोडल्यासंदर्भात १९ हजार ९५५ नागरिकांवर कारवाई झाली. यात संबंधितांकडून ३६ लाख ७७ हजार ७९० रुपयांचे शुल्क वसूल करण्यात आले. तर हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या        ५५ हजार ९२१ जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ७ लाख २८ हजार ३२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोबाईलवर बोलणे ७ हजार ४९२ जणांना महागात पडले व त्यांच्याकडून १२ लाख ९९ हजार ९९६ रुपयांचा दंड गोळा करण्यात आला.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर