शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

धक्कादायक ! २०० मिलियन भारतीयांचा डाटा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 21:58 IST

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देफेसबुक ही डाटा विक्रीची कंपनी : सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.फेसबुककडून ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने डाटा विकत घेऊन, त्याचा निवडणुकीत वापर केला होता. हा डाटा ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने २०१५ मध्ये विकत घेतला होता. ८७ मिलियन फेसबुक युजर्सच्या डाटाचा दुरुपयोग झाल्याचे २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली होती. सोशल साईटचा असा दुरुपयोग होत असल्याबद्दल युएस संसदेने याची दखल घेऊन, युएस सिनेटरच्या माध्यमातून फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग याची चौकशी केली. यात त्याला ४४ प्रश्न विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांची उत्तरे देण्यात झुकेरबर्ग असमर्थ ठरला. काही प्रश्नांवर त्याने दिलगिरी व्यक्त केली. युएस सिनेटरने विचारलेले प्रश्न आणि मार्क झुकेरबर्गने दिलेली उत्तरे याचा सखोल अभ्यास अ‍ॅड. लिमये यांनी केला. त्यांनी केलेल्या अभ्यासातून सोशल मीडियावर शेअर होत असलेली माहिती असुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यामते भारतात २०० मिलियन लोक फेसबुकचा वापर करतात. भारतीय हे डिजिटली निरीक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लिमये यांच्या मते निव्वळ फेसबुकचा डाटा स्टोअर होत नाही तर फेसबुक ज्या माध्यमातून आपण वापरतो, त्या माध्यमातून जे काही अ‍ॅपस वेबसाईटवर आपण काम करतो, वापरतो तो सर्व डाटा सुद्धा फेसबुकला स्टोअर होतो. जसे मोबाईलवरून आपण बँकेचे व्यवहार करतो आणि त्या मोबाईलवरून फेसबुकसुद्धा वापरत असेल तर बँकिंग व्यवहाराची सर्व माहिती फेसबुककडे स्टोअर होते.लिमयेंच्या मते भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फेसबुक, गुगलने सर्वाधिक पैसा कमविला आहे. आता सरकार आपली प्रत्येक स्कीम सोशल मीडियावर आणते आहे. सोशल मीडियावरील डाटाचा असा दुरुपयोग होत असेल तर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळे सरकारनेदेखील त्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.- डाटा सोशल मीडियावर शेअर करू नकाअ‍ॅड. लिमये यांच्या मते त्रास होईल असा डाटा सोशल मीडियावर शेअर करू नका. मोबाईलवरून बँकेचे व्यवहार टाळावे. सरकारनेसुद्धा सोशल मीडियाचा अपेक्षित वापर टाळावा.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर