शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

धक्कादायक! नागपुरात ११ दिवसात ११८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 20:02 IST

२६ जुलै ते ४ ऑगस्ट या ११ दिवसात ११८ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्दे‘को-मॉर्बिडिटी’ ठरतेय प्राथमिक कारण : गंभीर झाल्यावरच रुग्ण रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाने घेतलेला पहिला बळी ४ एप्रिल रोजी सतरंजीपुरा येथील ६४ वर्षीय पुरुषाचा होता. २९ एप्रिल रोजी मोमिनपुरा येथील ७० वर्षीय पुरुषाचा दुसरा मृत्यू झाला. त्यानंतर मृतांचा आकडा वाढतच गेला. मे महिन्यात ९, जून महिन्यात १४, जुलै महिन्यात १०१ तर गेल्या चार दिवसात ६३ मृतांची नोंद झाली. विशेष म्हणजे २६ जुलै ते ४ ऑगस्ट या ११ दिवसात ११८ मृत्यू झाले आहेत. मृतांची वाढती संख्या चिंतेचे कारण ठरत आहे. प्राथमिक अहवालानुसार, ‘को-मॉर्बिडिटी’ म्हणजेच ज्या लोकांना दीर्घकाळ मधुमेह, उच्च रक्तदाब आहे, काहींना हृदयविकार आहे, मूत्रपिंडाचा आजार आहे किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त वय आहे अशा रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होत नाही.जिल्ह्यात ४ ऑगस्टपर्यंत ६,४८३ रुग्ण बाधित झाले असून, यातील ३,८७४ रुग्ण बरे झाले आहेत. १८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील मृतांमध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. राज्यातील हा सर्वात कमी वयाचा मुलगा होता. त्याला ‘क्वॉड्री पॅरालिसिसी’ हा जुनाट आजार होता. उर्वरित मृत २० ते ८५ वयोगटातील आहेत. यात २० व २५ वर्षीय गर्भवती महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. यात २० वर्षीय गर्भवतीचा रक्तदाब वाढल्याने झटके येत होते. हे झटके एकामागून येत असल्याने प्रसूती करून झटक्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिचा मृत्यू झाला. दुसरी २५ वर्षीय महिला आठ महिन्यांची गर्भवती होती. कोविडच्या संसर्गामुळे तिची दोन्ही फुफ्फुसे खराब झाली होती. याच दरम्यान तिची नॉर्मल प्रसूती झाली. परंतु दोन दिवसात तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोविडच्या गंभीर संसर्गामुळे झाला असावा, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. चाळिशीच्या आतील चार रुग्णांचा मृत्यू कोरोनाच्या संसर्गासोबतच उच्च रक्तदाब, हृदयाचा विकार व लठ्ठपणा यामुळे झाल्याचे प्राथमिक अहवालातून दिसून येते. उर्वरित मृतांमध्ये अनियंत्रित व जुनाट मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसनाचा आजार, मूत्रपिंड व यकृताचा आजार असल्याचे समोर आले आहे. तज्ज्ञांनुसार, ज्यांना जुने आजार आहेत व ते अनियंत्रित आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे.४० ते ६० वयोगटात मृतांचे प्रमाण जास्तगेल्या ११ दिवसात ४० ते ६० या वयोगटात मृतांचे प्रमाण जास्त आहे. तज्ज्ञांनुसार, याच वयात बहुतांश लोकांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होतात. या वयात कुटुंबाची अधिक जबाबदारी त्यांच्यावर राहत असल्याने या आजाराकडे दुर्लक्ष होते. शिवाय, इतर लोकांच्या अधिक संपर्कात येत असल्यामुळे विषाणूंच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त संभवतो.केवळ कोविडमुळे मृत्यूचे प्रमाण कमीतज्ज्ञांनुसार, केवळ कोविडमुळेच होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. सर्वच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे म्हणजे फुफ्फुसाला झालेल्या इन्फेक्शनमुळे होत नाही. सुरुवात तिथून होते आणि मग इतर गुंतागुंत वाढून जीव जातो.छोट्याशा छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नकाछोट्याशा छोट्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन उपचार न घेतल्याने मृतांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे, ताप, सर्दी, खोकला व इतरही लक्षणे असलेल्यांनी स्वत:हून औषध घेऊ नये. औषध घेतल्याने बरे झालेले काही रुग्ण पाच ते सात दिवसानंतर अचानक अस्वस्थ होऊन रुग्णालयात येत आहेत. यातील काही रुग्णांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह येत असून, २४ ते ४८ तासात त्यांचा मृत्यू होत आहे. यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविडची तपासणी करून घ्या, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासून घ्या.डॉ. राजेश गोसावी विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू