बँकांच्या सेवेला फटका
By Admin | Updated: June 5, 2015 02:26 IST2015-06-05T02:26:01+5:302015-06-05T02:26:01+5:30
पाच सहयोगी स्टेट बँकांच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या आवाहनावरून गुरुवारी संप केला.

बँकांच्या सेवेला फटका
सहयोगी स्टेट बँक कर्मचाऱ्यांचा संप : अखिल भारतीय संपाचा इशारा
नागपूर : पाच सहयोगी स्टेट बँकांच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी स्टेट सेक्टर बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या आवाहनावरून गुरुवारी संप केला.
संपात स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ बिकानेर अॅन्ड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर व स्टेट बँक आॅफ पटियाला या सहयोगी बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटनांचे अधिकार कमी करण्यात येऊ नये, एसबीबीजे संघटनेवरील हल्ले थांबविण्यात यावेत, सहयोगी बँकांत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी, शासकीय नियमानुसार अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी सेंट्रल एव्हेन्यू येथील स्टेट बँक आॅफ त्रावणकोरपुढे निदर्शने केलीत.
स्टेट बँक आॅफ त्रावणकोर एम्प्लॉईज युनियनचे सहसचिव जयवंत गुरवे, ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे संघटन सहसचिव अशोक अतकरे, चेंडिल अय्यर, वीरेंद्र गेडाम व सुरभी शर्मा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जे. शर्मा यांनी वादग्रस्त मुद्यांवर समाधानकारक निर्णय न झाल्यास २४ जून रोजी अखिल भारतीय संप करण्याचा इशारा दिला.
श्रीनिवास केवडकर, विलास शेकोकर, रमेश अस्रानी, राकेश बंगाले, राज गोन्नाडे, आनंद अंबस्था, रजनी बजाज, मालती हेडाऊ, रिता बागडे, प्रीती सोनुले, अनुजा बेले, स्वाती सपाटे, स्वाती रंगारी, मुग्धा कुंभारे, ललित उपासे, रामकृष्ण रॉय, प्रकाश पंचभाई, विनोद झोडे, नीलेश किनकर, श्रीराम निमजे, भास्कर राव, अमीन पठाण, राकेश महुले, पंकज गजभिये, रामकृष्ण बोभाटे, प्रदीप मंगरुळकर, अंजली महाजन, कल्पना तारे, मनीष आंबटकर, विशाल तिवारी, श्रीधर बोरकर, राजेश बारापात्रे, दिलीप कवर्ती, किरण हेगे, जयेश शाह, सुधाकर राऊत, महेंद्र धमगाये, सचिन ढोणे, प्रीती लांडगे, धनबहादूर ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)