ठिकठिकाणी शिवजंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:13+5:302021-02-20T04:21:13+5:30
- गिट्टीखदान वॉर्ड येथे शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव वॉर्ड अध्यक्ष धनराज तेलंग यांच्या नेतृत्वात संपन्न झाला, प्रमुख अतिथी पश्चिम ...

ठिकठिकाणी शिवजंती साजरी
- गिट्टीखदान वॉर्ड येथे शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव वॉर्ड अध्यक्ष धनराज तेलंग यांच्या नेतृत्वात संपन्न झाला, प्रमुख अतिथी पश्चिम मंडळ अध्यक्ष विनोद कन्हेरे व नगरसेवक प्रमोद कौरती यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी भाजपा पदाधिकारी संगीता पाटील, मंदा चौधरी, प्रभा वानखेडे, माया उईके, उषा प्रजापती, दीपक शेवारे, संदीप कचडे, अमोल पानतावणे, कोमल कश्यप, निलेश नवनागे, आयुष तुपकर, प्रीत कनोजिया, मोहित यादव, प्रतीक शिंदे, अमन वर्मा, सुजल बैस्वारे, आदित्य श्रीरामे, उमेश शिरसाम व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवा मोर्चा अध्यक्ष विनीत शर्मा यांनी केले.
भाजप ओबीसी मोर्चा ()
-भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूर महानगरतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती न्यू चोपडे लॉन्स पोलीस लाईन टाकळी येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मोर्चाचे नागपूर महानगर अध्यक्ष रमेश चोपडे यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी चोपडे म्हणाले, शिवाजी महाराजांचे आदर्श आजच्या पिढीला हिताचे असून शिवाजी महाराजांचा जयघोष करताच साडेचारशे वर्षांनंतरही वृद्धालाही युवा असल्यासारखी स्फूर्ती येते.
कार्यक्रमास रवींद्र सोलव, प्रवीण ठवरे, नितीन गुडधे, घनश्याम खवले, कमलेश चकोले, शुभम पोद्दार, घनश्याम हनवते व युवक उपस्थित होते.
गोपालनगर तान्हा पोळा उत्सव समिती ()
- गोपालनगर तान्हा पोळा उत्सव समितीतर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने महालस्थित शिवाजी महाराज पुतळा, भेंडे ले-आऊट तसेच संभाजी चौक येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मास्कचे वाटप करीत शिवजयंती साजरी करण्यात आली. आयोजक पंकज निघोट यांनी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच सर्वांनी मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी पंकज थोरात, अजय नासरे, आकाश तायवाडे, वैभव काळे आदी उपस्थित होते.
झिंगाबाई टाकळी उत्सव समिती ()
- झिंगबाई टाकळी उत्सव समितीतर्फे टाकळी मैदान येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. संयोजक कृष्णा गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानकापूरचे पोलीस निरीक्षक मांडवधरे व कृष्णा शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी युवकांनी प्रात्यक्षिके सादर केली. याप्रसंगी पापाजी शिवपेट, संजय भिलकर, नागेश राऊत, जगदीश कोहळे, राजेंद्र बडिये, सुभाष मानमोडे, राजेंद्र गावंडे, स्वप्नील पातोडे, जगदीश गमे, संजय मांगे, किशोर गावंडे, स्वप्नील कटरे, राजन बारई, विजय गायधने, अजय गायकवाड, रुपेश काणेकर, राहुल मनोहर आदी उपस्थित होते.