शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:21 IST2021-02-20T04:21:36+5:302021-02-20T04:21:36+5:30

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डागा मेमोरियल हॉस्पिटल येथे फळ वाटप करण्यात आले. ...

Shivaji Maharaj's birthday celebrated with enthusiasm | शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डागा मेमोरियल हॉस्पिटल येथे फळ वाटप करण्यात आले. राकेश खोब्रागडे यांच्याहस्ते शिवरायांच्या प्रतिमेला मालार्पण करून उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय अधिक्षिका उपस्थित होत्या. संस्थेचे सचिव मुकेश मेश्राम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश घातला. कार्यक्रमाच्या आयाेजनात राकेश मेश्राम, सचिन राऊत, क्षितिज मेश्राम आदींचा सहभाग हाेता.

पिपल्स रिपब्लिकन पार्टी ()

पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त आनंदनगर, सीताबर्डी येथील पक्षाच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप जाेगेंद्र कवाडे यांनी मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांनी समाजात समता प्रस्थापित करून लाेकशाहीचा पाया रचल्याचे मनाेगत व्यक्त केले. याप्रसंगी विजय पाटील, कपिल लिंगायत, अजय चव्हाण, विपीन गाडगीलवार, रोशन तेलरांध्ये, सिद्धार्थ सोमकुवर, ॲड. अरुण महाकाले, भीमराव कळमकर, मुकेश खोब्रगडे, ॲड. राणा महाकाले, उत्तम हुमणे, दिलीप नितनवरे, कुशिनारा सोमकुवर, स्वप्निल महल्ले, महेंद्र पावडे, राहुल देशभ्रतार, डॉ. सुचित रामटेके, निकेश वानखेडे, पीयूष हलमारे, निरज पराडकर, अक्षय नानवटकर, दिलीप पाटील, भूषण डोंगरे, भीमराव मेश्राम, रोशन चव्हाण, प्रकाश अचकारपोहरे, सुमित सावकर, विजय बन्सोड, मंगेश कांबळे, मारुती धोटे, विशाल घुगरे आदी उपस्थित होते.

अभयनगर बास्केटबाॅल मैदान

दक्षिण पश्चिम नागपूर प्रभाग ३४ येथील अभयनगर बास्केटबॉल ग्राऊंडवर शिवजयंती साेहळ्याचे थाटात आयाेजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक नागेश मानकर, प्रभाग अध्यक्षा मंजुषा भुरे, जोशी, दिनेश टेकाडे, भाऊराव गायकवाड, हेमंत निराळे, कारखानीस, अनिरुद्ध पिपंळापुरे, विनय साठे, माधव ढोक, चंदू सार्वे, शुभम अंबुलकर, अमर नाडे, राजेश दुर्गे, राजेश पराते, दिलीप रहागंडे, नरेश नारनवरे आदी उपस्थित हाेते.

Web Title: Shivaji Maharaj's birthday celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.