शिवाजी महाविद्यालयात शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:25 IST2021-02-20T04:25:18+5:302021-02-20T04:25:18+5:30

नरखेड : मोवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषदेच्या शिवाजी महाविद्यालयात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी ...

Shiva Jayanti at Shivaji College | शिवाजी महाविद्यालयात शिवजयंती

शिवाजी महाविद्यालयात शिवजयंती

नरखेड : मोवाड (ता. नरखेड) येथील नगर परिषदेच्या शिवाजी महाविद्यालयात शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. किशोर झिलपे हाेते तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. प्रदीप गजभिये, डाॅ. सतीश जाधव, डाॅ. नारायण बालपांडे, प्रा. सुनील नारनवरे, डाॅ. वसंत निनावे, रवींद्र सोरते, नीलेश चनकापुरे, ओम माळोदे, प्रशांत ढोरे, राजेश नवनागे, पुरुषोत्तम वाडबुधे, नंदकिशोर बेले, रवींद्र गजबे उपस्थित हाेते. शिवरायांना रयतेचे राजे का संबाेधले जाते, यावर डाॅ. किशाेर झिलपे यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी महाराजांच्या राज्य कारभाराचे काही पैलूही त्यांनी उलगडून सांगितले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या गुणांचा अंगिकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. डाॅ. अशोक भक्ते यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. मंगला अंबाडकर यांनी सूत्रसंचालन केले तर डाॅ. प्रज्ञा कामडी यांनी आभार मानले.

Web Title: Shiva Jayanti at Shivaji College